जाणून घ्या !! वास्तुशास्त्रानुसार घड्याळाची योग्य दिशा..

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मनगटी घड्याळपासून ते डिजिटल घड्याळ पर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळ दररोज पाहतो आणि वापरतो सुद्धा. माणसाच्या आवडीनिवडीनुसार, पसंतीनुसार घड्याळाची खरेदी केली. वास्तविक पाहता आपल्या आयुष्यात घड्याळ्याच्या काट्यावर अस बांधलेला आहे, अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे.

मात्र घरातील भिंतीवर लावून असणाऱ्या घड्याळ विषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी माहिती दिली आहे. आपल्या जीवनाची वेळ सांगणारे घड्याळ एका विशिष्ट दिशेला लावल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.

या नुकसानापासून बचाव करण्यासाठी चला वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला असणे आणि त्यामुळे होणारे नुकसान काय? याविषयी जाणून घेऊयात.. वास्तुतज्ञ सांगतात की, घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची सुद्धा आवश्यकता असते.

घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले जाते. कारण कारण दक्षिणेकडे घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिणेकडे जाते त्यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढ होऊ शकते त्यामुळे दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये

असा सल्ला दिला जातो आणि यामुळे सौभाग्य धन आणि वैभव सुद्धा येऊन थांबतं, असे सांगण्यात येत. वास्तविकता केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडण्याच्या वेळेप्रमाणे काढायची सवय ही सर्वांनाच लागली.

मात्र आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्यामागे वेळ आहे एक घटक कारणीभूत असू शकतो असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असाही आहे. वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करूनच आपण आपली वेळही सुधारू शकतो.

त्यामुळे घड्याळ योग्य दिशेनं सेट केले नाही तर त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतो असंही वास्तुशास्त्र सांगत. अशा परिस्थितीत घराचे योग्य दिशेला धडाड लावून आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकत, म्हणून जेव्हा तुम्ही घरात घड्याळ ठेवतात तेव्हा ते नेहमी पूर्व, पश्‍चिम दिशेला ठेवावे. बकारण या दिशा घरात सकारात्मक ऊर्जेचा आणण्याचं काम करतात.

याशिवाय सुख-समृद्धीत वृद्धी होते असेही सांगितले जात. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधी हे तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवणे असेही सांगितले जात. याबाबत बोलताना वास्तू तज्ञ सांगतात की, घरातील घड्याळ किमान एक ते दोन मिनिटं पुढे ठेवावे.

तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवल्यास जीवनात बाधा निर्माण होऊ शकतात. तसेच परिश्रम एकढ पण मिळत नाही. कार्यक्षेत्रात अडचणी येतात. नातेसंबंध ताणले जाऊ शकतात. याचबरोबर अनेक रंग प्रकारांची, आकारांची, शैलीची, पद्धतीची घड्याळे आपण पाहतो

मात्र वास्तुशास्त्रानुसार पेंडुलम आकाराची घड्याळ अधिक शुभ मानले जाते. याबरोबरच बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये. घड्याळातील सील संपले असतील तर लगेच बदलावे किंवा घड्याळ मधील तांत्रिक त्रुटी शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात.

बंद पडलेले घड्याळ घरांत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाहतो असं सांगितलं जातं. याशिवाय घड्याळ खरेदी करताना कधीही निळ्या रंगाचं काळ्या रंगाचे किंवा नारंगी रंगाचे घड्याळ कधीही खरेदी करू नये. यातून बाहेर पडणारी ऊर्जा नकारात्मक ठरू शकते.

याशिवाय त्याचप्रमाणे पलंगावर घड्याळ कधीच ठेवू नये, यामुळे डोकेदुखी सुद्धा वाढू शकते असे सांगितले जात. अशा प्रकारे आपल्याला हे घड्याळ ठेवण्याच्या दिशासुद्धा ठरलेले आहेत.

वास्तुशास्त्रानुसार त्याचा अवलंब केल्यास आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळतो असं सांगण्यात येतात. तुमच्या घरात कोणत्या दिशेला घड्याळ लावले आहे आणि तुम्हाला काय फायदा झाला का अथवा नुकसान झालं मला कमेंट करून नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *