या 4 वस्तू चुकूनही दान करू नये, नाहीतर..

अध्यात्मिक माहिती

कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचं खूप महत्त्व आहे. तसही दानापेक्षा मोठ कोणतच पुण्य नाही. दान केल्याने फक्त शांती मिळत नाही, तर कितीही ग्रहादोष असतील तर त्या नष्ट होतात. परंतु कळत-नकळतपणे अशा वस्तूही आपण दान करून बसतो.

ज्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी, बाधा आणि संकटे येऊ लागतात आणि खरं तर यामुळे आपल्या घरात गरिबी येण्यास सुरुवात होते. कारण शास्त्रानुसार अशा 4 वस्तू आयुष्यात कधीच कोणालाही दान करू नये. कोणत्या आहेत त्या चार वस्तू चला जाणून घेऊयात…

शास्त्रानुसार अशा कितीतरी वस्तू आहे ज्या दान म्हणून कोणालाही देऊ नये. परंतु नकळतपणे आपल्या चुका होत असतात आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ज्या 4 वस्तू कोणालाही तुम्ही देऊ नये.

अथवा त्या देतांना कोणते नियम पाळावेत. ज्यामुळे घरात दारिद्र प्रवेश करणार नाही. तर ज्योतिष शास्त्रानुसार कोणकोणते दान करू नये.

यातली पहिली गोष्ट म्हणजे लोणचे होय. कारण लोणचे असा प्रकार आहे जो लवकर खराब होत नाही. लोणच वर्षानुवर्षे छान टिकत. त्याचा अर्थ असा होतो की, देवी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर असते. काही स्त्रिया म्हणतात आमच्या घरात लोणचं टिकतच नाही तर ते लवकर खराब होत.

या घरांमध्ये लोणचे खराब होण्याचे कारण म्हणजे त्या घरातील वास्तुदोष आहे असू शकतो. तसेच अनेक स्त्रिया घरात लोणचं बनवल्या बनवल्या एकमेकांना लोणचं देतात. मात्र करू नये.
लोणचं जर तुम्हाला द्यायचं असेल तर लोणचं दिल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी घ्याव किंवा थोडे पैसे तरी घ्यावे.

परंतु ज्या घरांमध्ये लोणचं टिकतात, त्या घरांमध्ये देवी लक्ष्मी माता कृपा असतेच. म्हणून अशातच लोणचं कोणालाही देऊ नये. या सोबतच आपली नाती गोती सुद्धा बिघडू लागतात. कारण त्यामध्ये आंबटपणा असतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांढरे तीळ होय. पांढऱ्या तिळाचे दान खूप सावध राहून करावं असं म्हणतात. जसं काळे तिळाचे दान केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात, कारण काळे तीळ भगवान श्रीहरी विष्णूचा प्रतीक मानले जात.

परंतु पांढरे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. पांढरे तीळ दान करणे म्हणजे आपल्या जीवनातून देवी लक्ष्मी निघून जाणं होईल असं सांगण्यात येतं. आजपर्यंत जर तुम्ही ही चूक केली असेल तर ती सोडून द्या. यापुढे ही चूक होता कामा नये याची काळजी घ्यावी.

पुढील वस्तूं म्हणजे धने होय. धने सुद्धा देवी लक्ष्मीला प्रिय आहे. ज्या घरांमध्ये धनी असतात किंवा कोथिंबीर लावलेली अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असतं, म्हणून धन दान कधीही करू नये. जर कोणी धन किंवा कोथिंबीर मागितली तर त्या बदली पैसे घ्यावे मग त्यांना या वस्तू द्याव्यात असं सांगण्यात येते.

त्यानंतर पुढील चौथी वस्तू म्हणजे जुने कपडे. आपण शॉपिंगक रतो नवीन नवीन कपडे आणल्यावर जुने कपडे तसेच पडून राहतात. मग त्या कपड्यांचे करायचं काय तर तिकडे तुम्ही दान करू शकता. हे कपडे दान करण्याचा मुख्य नियम म्हणजे त्या कपड्यांना स्वच्छ धुऊन दान करावे.

आपण घातलेले कपडे तसेच इतरांना दान केल्यास आपलं नशीब त्या व्यक्तीला वाटलं जातं आणि आपलं भाग्य इतरांकडे आकर्षित होतं असं म्हणतात. त्यामुळे वापरलेले कपडे धुतल्यावर दान करावे असे सांगण्यात येतात.

तर मित्रांनो लक्ष्मी हे चंचल आहे जर ती नाराज होऊन निघून गेली. तर पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे भुकेल्याला अन्न देण, तहानलेल्याला पाणी देणे सर्वात मोठं दान आहे. कोणाला दान म्हणून पैसे देणार हे सर्वात नुकसानदायक ठरत असे म्हणतात.

कारण त्या व्यक्ती त्या पैशाचं चुकीचं काम केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात, असे म्हणतात. यासोबतच दान करताना कोणालाही गोड वस्तू दान नक्की करावा, यामुळे आपल्या सुख समृद्धी येते असं सांगितलं जातं.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *