गुढीपाडव्याच्या आधी या ४ राशींच्या नशिबाला कलाटनीचे योग

राशिभविष्य अध्यात्मिक

वैदिक ज्योिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. या ग्रहांच्या राशी परीवर्तनाचा वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्व राशींवर दिसून येत असतो. मार्च महिन्यात तब्बल चार ग्रहांचे काही दिवसांच्या फरकाने गोचर होणार असल्याचे समजत आहे.

यातील पहिले ग्रह परिवर्तन 12 मार्चला झाले आहे, या दिवशी शुक्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. तर या पाठोपाठ 13 मार्चला मंगळ ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. 15 मार्च ला बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. 28 मार्च ला गुरु मीन राशीत अस्त होणार आहे.

या चारही ग्रहांच्या राशी परिवर्तनाच्या वेळी कुंभ राशीतील उदय स्थितीत असणारे शनिदेव व ग्रहांचा राजा सूर्य हे उत्तम साथ देण्याच्या स्थितीत असतील. या ग्रह गोचरांनी सर्व राशींच्या कुंडलीत कमीत कमी अधिक परिणाम होण्याचे चिन्ह आहेत. मात्र अशा काही राशी आहेत ज्यांना प्रचंड धनलाभःसह प्रगतीचे योग आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते चला आपण जाणून घेऊया.

पहिली रास म्हणजे मेष रास : मेष राशींच्या मंडळींसाठी आर्थिक तंगीतून मुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. या काळात आपल्याला नव्या वाहन व घराच्या खरेदीचा योग आहे. तुम्ही सुरू केलेल्या सर्व कामांमध्ये यश लागू शकते. पण तुम्हाला प्रचंड संयमाने वागावे लागेल. याशिवाय वाणीवर नियंत्रण ठेवण आपल्या हिताचे ठरणार आहे. तुम्हाला कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊन मानसिक ताण तणावातून दूर होऊ शकता.

दुसरी रास म्हणजे मिथुन रास : मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत मंगळदेव अत्यंत लाभदायक स्थितीत स्थिर होत असल्याने तुम्हाला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला गुंतवणुकीवर खूप भर देण्याची गरज आहे. तुमच्या आईची साथ अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे लागून तुमचे मोठे संकट टळू शकते. जोडीदारासह थोडी मतभेद होऊ शकतात पण महिन्याच्या आखेरीस प्रेमातील गोडी गुलाबी पुन्हा पाहायला मिळेल.

तिसरी रास म्हणजे वृश्चिक रास :  वृश्चिक राशीचा येत्या काळा मध्ये केवळ धनलाभ नव्हे तर शाश्वत प्रगतीचे योग आहेत. तुम्हाला मागील कित्येक वर्षात केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुम्हाला मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका. लक्ष्मी चंचल असल्याने तुम्ही जर का वेळेस पैसे वाचवण्याची व वाढवण्याची तरतूद केली नाही तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. वडिलांच्या संपत्तीचा तुम्हाला मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

चौथी रास म्हणजे धनु रास : धनु राशींच्या विवाह इच्छुक मंडळींसाठी मार्च महिन्यातच लग्न जुळवण्यासाठी उत्तम योग आहे. तुम्हाला कामाच्या निमित्त परदेशवारीचे योग आहेत. आरोग्याच्या बाबत अजिबात हेळसांड करू नका. तुमचे हित शत्रू वाढू शकतात पण तुम्हाला त्यांना प्रेमाने व गोडव्याने जिंकावे लागेल. तुमच्या भाग्यात नव्या प्रॉपर्टीच्या खरेदीचे संकेत आहेत. मात्र अत्यंत सावध निर्णय घ्यावे लागतील. शेअर मार्केट येत्या काळात तुम्हाला नव्या आर्थिक मिळकतीचे मार्ग मिळवून देऊ शकते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *