सूर्य ग्रहण कधी लागणार? ग्रहणाचा या राशींवर असेल भारी प्रभाव!

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येक वर्षी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे येतच असते. या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांची विशेष अशी काळजी देखील घेतली जाते. ग्रहणाचे अनेक शुभ अशुभ परिणाम आपणाला पाहायला देखील मिळतात. तर वर्षातील पहिले ग्रहण हे 20 एप्रिल रोजी लागणार आहे परंतु हे जे सूर्यग्रहण आहे.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.  परंतु या ग्रहणांचा काही राशींवर शुभ तर काही राशीवर अशुभ परिणाम होणार आहे. तर हे सूर्यग्रहण कोणत्या राशींना भारी असणार आहे याविषयी जाणून घेऊ. म्हणजेच त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर पाहूया.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवार २० एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होईल. ज्योतिषशास्त्रातही ग्रहणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे.जरी ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. परंतु धार्मिकदृष्ट्या ती शुभ मानली जात नाही. कारण ही वेळ अशी असते जेव्हा सूर्यावर राहूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य पीडित होतो.

20 एप्रिल रोजी होणारे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षातील पहिले ग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होईल. त्यामुळे मेष राशीच्या लोकांवर या ग्रहणाचा खोलवर परिणाम होईल. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मेष राशीतील लोकांना या ग्रहणाच्या प्रभावामुळे अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे या मेष राशीतील लोकांनी विशेष अशी काळजी घेणे आवश्यक आहे. यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन देखील करावा लागू शकतो.

सूर्यग्रहणाच्या काळात मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या ग्रहणामुळे मेष राशीतील लोकांना त्यांच्या कर्माचे अशुभ फळ देखील मिळू शकते. त्यांनी या ग्रहण काळामध्ये केलेली कामे खराब देखील होऊ शकतात. या सूर्यग्रहणामुळे मेष राशीतील लोकांचा मानसिक ताण देखील वाढण्याची शक्यता आहे.

या ग्रहण काळामध्ये मेष राशीतील लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूपच गरजेचे आहे. कारण जर तुम्ही आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हीच अनेक आर्थिक अडचणीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे या सूर्यग्रहण काळामध्ये तुम्ही आपल्या बोलण्यावर नक्कीच नियंत्रण ठेवायला हवे.

तर अशा या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा परिणाम मेष राशीतील लोकांना खूपच भारी पडणार आहे. म्हणजे त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी संकटे यांचा सामना करावा लागू शकतो. हे सूर्यग्रहण यांच्यासाठी खूपच भारी असणार आहे. म्हणजे खूपच अडचणीचे ठरू शकते.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *