वधूचे वय वरापेक्षा कमी असावे असे का म्हणतात? या मागचे कारण काय ?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, लग्न म्हटलं की दोन जीवांचे एकत्र येणे. सुखी संसार करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आवडीचा जोडीदार निवडत असतात. हा जोडीदार निवडत असताना मग आपण कुंडली तसेच नक्षत्रे यांचा विचार करून मगच विवाह करतात. तर अलीकडच्या काळामध्ये आता लव मॅरेज खूपच गाजत आहे.

तर मित्रांनो आपण जेव्हा आपल्या मुलांचा किंवा मुलगीचा लग्नाचा विचार करत असतो त्यावेळेस मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वयाचा विचार करतातच. म्हणजे वरापेक्षा वधूचे वय कमी असावे असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. परंतु मित्रांनो वधूचे वय हे वरापेक्षा कमी का असावे? या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? तर मित्रांनो हेच आज मी तुम्हाला आजच्या लेखांमध्ये सांगणार आहे.

तर मित्रांनो लग्नामध्ये वधूचे वय हे वरापेक्षा लहान असावे हे भारतीय संस्कृतीत वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे आणि तसा समाजाचा ही समज झालाय. यामागे काही सायन्टिफिक रिझन आहे काय की ही फक्त मान्यता आहे. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आज तुम्हाला सांगणार आहे. यामुळे तुमचे गैरसमजही दूर होतील.

मित्रांनो खरं तर यामागे कुठलेही शास्त्रीय कारण नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते हा केवळ गैरसमज आहे. विशेष म्हणजे गुजराती लोकांत मुलींचेच वय जास्त असते. मात्र तिथे याबाबतीत काही अडचण नसते. तर मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की वधूचे वय हे वरापेक्षा जास्त देखील असते आणि त्यांचा संसार देखील सुखाचा चाललेला आहे मग मित्रांनो वधूचे वय हे वरापेक्षा कमी असावे की परिभाषाच चुकीची वाटते.

तर डॉक्टरांच्या मते, आधुनिक मानसशात्रज्ञांनी असा दावा केलेला आहे की २१ वर्षे वयाच्या मुलाचे मानसिक वय हे १८ वर्षाच्या मुलीच्या मानसिक वयाइतके असते. मानसिक वयासारखे असलेला मुलगा आणि मुलगी यांचा विवाह झाल्यास त्यांच्या विवाहोत्तर आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगाकडे बघण्याची त्यांची दृष्टीही सारखी राहते.

यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन खूपच आनंदी जाते. तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा कायम राहतो. म्हणून लग्नात वधूचे वय हे वराच्या वयापेक्षा तीन ते पाच वर्षांनी कमी असावे अशी प्रथा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *