सत्य घटनेचा हृदयस्पर्शी प्रसंग …

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ

अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे. तेथेच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केल्या नियंत्रणात येत नव्हता.

माहूत आपापल्या परिने प्रयत्न करीत होते. मात्र, अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली.

स्वामी समर्थ महाराज शिकवण :

भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात

एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले. तरी तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावीत असे. अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. राजे महाराजांना म्हणाले की, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे.

नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही. अनेक प्रयत्न करून थकलोत. त्याला देहान्ताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला.

स्वामी समर्थ शिकवण: अहंकार प्रगतीस बाधक; निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ

राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत स्थानिक, भक्तगण महाराजांना विनंती करू लागले की, महाराज या रस्त्याने जाऊ नका. तो हत्ती मोठमोठे दगडसारखा भिरकावीत असतो. मात्र, महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जगावर चालते. ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वत:ला सेवक म्हणत होते, ते देह-बुद्धी धरून पळून गेले. हत्तीला बांधून ठेवले होते, तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले.

स्वामी समर्थांची शिकवण: देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे

महाराज कंबरेवर हात ठेऊन हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की, अरे मुर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा आभिमान सोडून दे, अशी स्वामींची आज्ञा एकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला.

आपल्या पुढच्या पायाचे गुढगे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू वाहू लागले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *