तुमच्या पर्समध्ये ठेवा हळद लावलेली 1 नोट पैसा आपोआप खेचला जाईल

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्याजवळ भरपूर पैसा असावा असे वाटत असते. यासाठी प्रत्येक जण मेहनतही घेत असतो. परंतु मेहनत घेऊन मिळालेल्या पैशांमध्ये गरजा भागत नसल्याने आपण निराश होतो. आलेला पैसा नक्की कुठे जातो तेच कळत नाही.

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तो नक्कीच आपल्याला अपुरा पडतो. त्यामुळे आपल्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार यायला सुरुवात होते. आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि आपण कुटुंबातील सर्वांचे सर्व गरजा भागवाव्यात असं आपल्याला वाटत असते. त्यासाठी आज आपण उपाय बघणार आहोत.

मित्रांनो हा उपाय केल्याने पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जातो असं म्हणतात. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण हळदीचा वापर करतो. जसे की, धार्मिक क्षेत्र असेल किंवा आहारामध्ये असेल मसाल्यात हळद वापरल्याने खाण्याची रंगत वाढते. हळद औषधी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे.

परंतु ज्योतिष शास्त्राप्रमाणे सुध्दा हळदीचे अनेक उपाय आहेत. हळद वापरून अनेक ग्रहांच्या समस्या सोडवता येऊ शकतात. हळदीच्या पिवळा रंगाला बृहस्पती ग्रहांशी जोडून बघितल जाते. म्हणूनच जातकाच्या कुंडलीत जर गुरु कमजोर असेल तर हळदीचे उपाय करायला सांगितले जातात.

बृहस्पतीला मजबूत करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. मित्रांनो पैसा संबंधित सर्व अडचणी दूर करणारा आणि आपल्याकडे पैसा आकर्षित करणारा हळदीचा एक उपाय आहे. जो आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुमचा पगार होईल किंवा जेव्हा तुमचे उत्पन्न तुमच्या हातात येईल त्यातली एक नवी कोरी नोट आपण देवासमोर ठेवायचा आहे आणि ती नोट कितीही रुपयांची असली तरी चालेल. त्यानंतर ती नोट आपल्याला देवघरातील लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर ठेऊन प्रार्थना करायची आहे.

त्या नोटेवर थोडीशी हळद लावायची आहे. अशा पद्धतीने कोणत्या ही दिवशी एका नव्या नोटेची पूजा करून तिला हळद लावून ती नोट आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पाकीटामध्ये ठेवायचे आहे. परंतु मित्रांनो एकदा ही नोट आपण पूजा करून आपल्या पर्समध्ये ठेवल्यानंतर ती नोट आपल्याला कधीही खर्च करायची नाही.

तसेच कोणालाही द्यायची नाही. हा छोटासा उपाय केल्यामुळे आपल्याकडे पैसा खेचला जातो असे म्हणतात आणि आपल्या घरात असणाऱ्या आर्थिक संकटातून आपली सुटका होते. आपण कर्जमुक्त होतो. त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रानुसार धनसंपत्ती मिळवण्यासाठी आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी हळदीचे अनेक उपाय केले जातात.

जर आपण गाठ असलेली हळद पिवळ्या दोऱ्यात बांधून आपल्या दंडात किंवा आपल्या गळ्यात घातले तर कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने त्यांची शुभ फल प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या सुटतात. तसेच विवाहात अडचणी येत असतील तर त्या सुद्धा दूर होतात.

त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर या व्यतिरिक्त हळद मिश्रित पाणी सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. हळदीमुळे नकारात्मकता दूर होते.

वाईट दृष्ट लागली असेल तर ते निघून जाते. जर घरात वादविवाद होत असतील, अनावश्यक कटकटी होत असतील तर हळदीचे हे काही उपाय उपयोगी ठरू शकतात. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचा तिलक केल्यानेसुद्धा कामात यश मिळतं असे म्हटले जाते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *