मंदिरात जाताना ही चूक करू नका लक्ष्मी घर सोडून जाईल.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

घरात गरिबी येण्याची 7 कारणे आज आपण पाहणार आहोत. कित्येक लोक दररोज देवपूजा करतात, व्रतवैकल्ये, उपवास करतात. मात्र तरी सुद्धा घरातुन दरिद्रता, गरिबी काही जात नाही, लक्ष्मी प्रसन्न होत नाही अशा वेळी हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या या 7 गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

जर आपल्याही हातून या 7 चुका वारंवार होत असतील तर लक्ष्मी घरात कधीच येत नाही. मित्रानो जाणून घेऊयात की, या 7 गोष्टी कोणत्या आहेत. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये भविष्यपुराण अस मानत की, कोणत्याही मंदिरात देव दर्शन घेण्यासाठी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आपल्या चपला किंवा बूट या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंबरठ्याजवळ सोडू नका.

अशा ठिकाणी सोडू नका की ज्या ठिकाणी इतर लोक जेव्हा मंदिरात प्रवेश करतात तेव्हा ते तुमच्या चपला आणि बुट ओलांडतील. भविष्यपुराण असं म्हणतात की जेव्हा तुमच्या चपला आणि बूट हे इतर व्यक्तींकडून ओलांडले जातात तेव्हा त्यास सर्व व्यक्तींचे दोष त्या सर्व व्यक्तींच्या जीवनातील दुःख हे तुमच्या भाग्यामध्ये येतं.

हे तुमच्या वाट्याला येत ही चूक करू नका. जी गोष्ट मंदिरांची तिच गोष्ट आपल्या घराची. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जो मुख्य दरवाजा आहे, त्या चौकटीसमोर किंवा त्या उंबरठ्यासमोर आपण आपले चपला आणि बूट सोडू नका. माता लक्ष्मी दररोज 7 वेळा प्रत्येक व्यक्तीच्या घरात प्रवेश करते.

मात्र ज्या व्यक्तीच्या घरासमोर चपला आणि बूट अशाप्रकारे सोडलेले असतील माता लक्ष्मी त्या घरात कधीच प्रवेश करत नाही ती आल्या पावली परते निघून जाते. या चुका आपण कटाक्षाने टाळा.

लिंगपुराण अस मानत दुसरी गोष्ट आपण बघत आहोत लिंगपुराणानुसार जेव्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये देव दर्शन घेण्यासाठी जाता आणि देवापुढे नतमस्तक होऊन हात जोडता तेव्हा जरबआपल्या पाठीमागे काही भक्त हे ताटकळत उभे असतील तर त्यांना जास्त वेळ वाट पाहायला लावू नका.

आपलं दर्शन आपण ताबडतोब घ्या आणि बाजूला व्हा. तसे जेव्हा आपण महाअभिषेक घालतो, महाअभिषेक करता किंवा ओटी भरता तेव्हा आपल हे सर्व चालू असताना जर इतर भाविक आपल्यामुळे आपल्या कारणामुळे रांगेत ताटकळत उभे असतील तर हा सुध्दा ईश्वर आणि त्यांचे भक्त यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जातो हा एक मोठा दोष आहे.

यापासून सुद्धा आपण दूर राहा. मित्रांनो जेव्हा आपण घरामध्ये दूध आणि दही या दोन गोष्टी सोबत घेऊन येतो तेव्हा तेव्हा आपल्या घरात दरिद्रता सुद्धा पाठोपाठ येते. ज्याप्रकारे लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे धन, वैभव, पैसा सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी मंगल

त्याच्या अगदी उलट लक्ष्मीची बहीण आहे दरिद्रता देवी अलक्ष्मी. ही लक्ष्मी म्हणजे गरिबी, कंगाली दरिद्रता सर्व प्रकारच्या अमंगल अशुभ गोष्टी. जेव्हा दूध आणि दही आपण सोबत आपल्या उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा आपल्याबरोबर दरिद्रता देवी सुध्दा येते. आणि मग अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही.

हिंदू धर्मशास्त्र अस मानत की, गणेश मुर्ती म्हणजेच भगवान श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो गणपती बाप्पांचा फोटो हा आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये कधीही आपण कुणालाही भेट म्हणून गिफ्ट म्हणून देऊ नये. आपल्या घरातील संपदेमध्ये कमी येते.

आपल्या घरात जे संपन्नता आहे, जे काही तुम्ही कमावलेला आहे त्यातून तुमच्या घराची जी रोनक आहे ती हळूहळू कमी होऊ लागते. गणेश मूर्तीप्रमाणेच लाफिंग बुद्धा म्हणजेच ज्याला कुबेर स्टॅच्यू असही म्हणतात. लाफिंग बुद्धा ही सुद्धा मूर्ती भेट देण्यासाठी नाही.

आणि आवळ्याचं रोपटं या आवळ्याच्या रोपट्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्रीविष्णू वास करतात. हे आवळ्याचं रोपटं सुद्धा कुणालाही भेट म्हणून किंवा गिफ्ट म्हणून आपण देऊ नका दान करू नका. घरातील संपदा ही क्षीण होऊ लागते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *