मृत किंवा मेलेल्या व्यक्तीचे कपडे का घालत नाही?

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू संस्कृतीत जर कोणी व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीशी निगडित सर्व वस्तू त्या व्यक्तीबरोबर दिल्या जातात. जसे त्या व्यक्तीचा चष्मा, नेहमी हातात असलेली छडी, छत्री नेहमीच्या वापरातले कपडे आणि या सर्व वस्तू त्या व्यक्तीला अग्निडाग दिला की, त्यात स म र्पि त केल्या जातात. या मागे हा हेतू असतो की, त्या व्यक्तीची आत्मा त्या वस्तूद्वारे परत येऊ नये.

कधी कधी असे घडते की एखादी व्यक्ती मृत झाली की, त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या बहुतेक वस्तूंचे अचानकपणे हालचाल होऊ लागते. घरात चित्र विचित्र अनुभव येऊ लागतात अचानक दाराची कडी वाटते घरातील एखादी वस्तू दुसरीकडेच सरकते. हे असे का होते.

ती मृत व्यक्ती आत्मा बनून परत आलेली असते का? नाही, आपण ज्या वस्तूंच्या संपर्कात राहतो त्या वस्तुंना आपली ऊर्जा प्राप्त झालेली असते. आणि या ऊर्जेमुळे ही हालचाल, अफरातफर होत असते. असे म्हणतात की, मृत व्यक्तीचे कपडे जिवंत व्यक्तींनी कधीही परिधान करू नये.

पूर्वीच्या काळी तर व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू कपडे सर्वकाही अग्निकुंडात टाकून देत असत. आणि कधीतरी वापरले जाणारे कपडे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना दिले जात असत.

तसे मुले-मुली, नातू आणि तरीही हे कपडे त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाल्याशिवाय वापरली जात नसत. काय कारण असेल बरे? याचे खरे कारण हे आहे की, त्या व्यक्तीची ऊर्जा, प्रेम, भावना त्या व्यक्तीशी जुळलेली असतात आणि एकदा ती व्यक्ती जर मृत झाली तर ही ऊर्जा हळूहळू बाहेर पडू लागते.

ती व्यक्ती या कपड्यांद्वारे परत येऊ शकत नाही. परंतु त्या व्यक्तीची जी ऊर्जा या कपड्यांवर सामावलेली आहे ती बाहेर पडताना थोडीशी हालचाल जाणवते. आपल्याला ती व्यक्ती आपल्या आसपास असल्याचा भास होतो. आणि आपल्याला वाटते की, खरोखर ती व्यक्ती आपल्या आसपास आहे.

म्हणून त्या कपड्यांमधील संपूर्ण ऊर्जा बाहेर पडेपर्यंत ते कपडे कोणी घालू नयेत. जर आपल्यावर कोणाला करणी करायची असेल तर आपला एखादा केस किंवा नखं जे आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे ते जर त्या व्यक्तीला मिळाले तर ते आपल्यावर सहज करणी करू शकतात.

परंतु ज्या व्यक्तीला जर त्यापैकी काहीही मिळाले नाही तर ते आपल्या वापरलेल्या कपड्यांचा वापर करूनही आपल्यावर करणीचा प्रयोग करू शकतात. कारण त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा सामावलेली असते आणि या ऊर्जेमुळे आपण सहज कोणाच्याही वाईट जाळ्यात फसू शकतो. इतके हे या ऊर्जेचे म ह त्व असते. म्हणून पूर्वीच्या काळी न धुतलेले कपडे घरातच ठेवले जात असत आणि धुतल्यानंतरही आपल्या नजरेत राहतील अशाच ठिकाणी कपडे वाळवले जात असत.

आता तसे काहीही राहिले नाही अंगावरील काढलेले कपडे सरास धोब्याकडे धुण्यासाठी दिले जातात. परंतु हे खुप चुकीचे आहे. निदान धोब्याकडे कपडे देण्यापूर्वी पाण्यातून बुडवून तरी काढावेत म्हणजे आपली ऊर्जा त्यातून निघून जाईल व पुढे आपल्याला त्यापासून काही धोका होणार नाही. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव आलेला असेल की, जर आपण एखाद्या वेळी इतर कोणाचे कपडे घातले तर आपले विचार, आपले वागणे हे थोडे फार तर त्या व्यक्तीसारखे होते, ज्या व्यक्तीचे आपण कपडे घातलेले आहे.

जर आपण धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीची कपडे घातले तर आपण धार्मिक कार्यात उतरतो. आणि जर आपण भांडखोर व्यक्तीचे कपडे आपण घातले तर आपणही चिडचिड करू लागतो, भांडणतंटे करू लागतो. हे असे कश्यामुळे होते तर त्या कपड्यांमधील ऊर्जामुळे होत असते. म्हणून इतरांचे कपडे जर आपल्याला घालायचे असतील तर सर्वात आधी एकदा पाण्यातून काढून वाळवून घ्यावेत व त्यानंतरच ते परिधान करावेत.

मृत व्यक्तींचे कपडे शक्यतो घालूच नयेत. आणि जर कपडे चांगले असतील, जास्त वापरलेले नसतील तर ते कपडे त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाले, त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन 1 वर्ष झाले की, त्यानंतरच ते कपडे वापरावेत. म्हणजे वर्षभरात या व्यक्तीची संपूर्ण ऊर्जा नष्ट झालेली असते. आणि अशा कापड्यांमधून आपल्याला कोणताही धोका नसतो.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *