महिलांनी अवश्य वाचा. स्वयंपाक घरात या 4 गोष्टी कधीही संपवू नका.

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

स्वयंपाक घर ज्याला काहीजण किचन किंवा स्वयंपाकाची खोली असे म्हटले जाते. तर स्वयंपाक घर हे एक अशी जागा आहे की, घरातील सर्व कुटुंबीयांचे पोट भरते. म्हणूनच स्वयंपाक घरात काही दोष असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण घरातील कुटुंबावर होतो आणि हा परिणाम होऊ नये या कारणामुळे आपल्याला स्वयंपाक घराविषयी काही माहीत असायलाच हव्यात.

मित्रांनो या गोष्टी नेहमी पुरेशा जास्त ठेवल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणलेल्या असाव्यात. या गोष्टी पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरात न का रा त्म क ता निर्माण होते. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या स्वयंपाक घरात कधीही संपू द्यायचे नाहीत या चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.

1) मीठ : आपल्या जेवणात मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक घरात मीठ नेहमीच असते परंतु कधी कधी असे होते की थोडेसे मीठ राहते. तेव्हा आपण असा विचार करतो की आज पुरते मीठ आहे. आपण मीठउद्या आणू आणि आपण ते मीठ सर्व संपवतो. परंतु कधीही घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. मीठ घरात जास्तीचे आणून ठेवावे. आपल्या घरात सारखे सारखे संपूर्ण मीठ संपून जाणे यामुळे घरात न का रा त्म क ता येऊ शकते.

यामुळे घरात वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो त्याचा सर्वात जास्त प्रभाव घरातील महिलांवर पडण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ नेहमी थोडेसे जास्त आणले पाहिजे. किंवा संपण्यापूर्वीच आणायला हवे आणि तसेच मीठ खराब होणारी किंवा नासणारी गोष्ट नाही. जेव्हा या गोष्टी पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरात न का रा त्म क ता निर्माण होते.

2) हळद : हळद हा एक मसाल्याचा पदार्थ हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हळद सर्वांच्या घरी स्वयंपाकात वापरणारी वस्तू आहे. जे आज्ञा चे रूप सुधारून त्याचे सौंदर्य वाढवतो. हळदीचा उपयोग शुभ कार्य आणि पूजेमध्ये देखील केला जातो पण भगवान विष्णूंनाही हळद ही प्रिय आहे. हळद घरात संपणे म्हणजे गुरु ग्रहाचा दोष लागल्याबरोबर मानले जाते.

म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नका. एक तर जास्त हळद आणून ठेवा किंवा ती संपण्यापूर्वीच आणून ठेवा. कारण जसे मीठ खराब होत नाही तसेच हळद सुद्धा वर्षानुवर्षे टिकते. जेव्हा घरात हळद पूर्णपणे संपते तेव्हा मुलांचे अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष लागत नाही. शुभ कार्यात अडथळे निर्माण होतात. आपल्या घरात शुभ कार्य व आनंद भरभरून येण्यासाठी हळद कधीही कमी पडू देऊ नका.

3) पीठ : पीठ ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची आहे तेवढीच गरजेचे सुद्धा आहे. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये पीठ संपण्याअगोदरच ते घरात हजर असते. परंतु कधी कधी घरात असलेले हे पीठ पूर्णपणे कमी होते. कारण काही वेळेस आपण दळण करण्यास कंटाळा करतो पण तसे करू नका. ज्यामुळे ज्या भांड्यात किंवा डब्यात पीठ ठेवता त्यात थोडेसे पीठ नेहमी शिल्लक ठेवावी. ते पूर्णपणे रिकामे करू नये. जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानाबद्दलचे नुकसान होऊ शकते. कारण पीठ आहे तर पोळ्या आहेत तर बिना पोळ्या आपला स्वयंपाक अपूर्ण आहे.

4) तांदूळ : तांदूळ हे स्वयंपाक घरात महत्वाचे तर आहे. पण तांदूळ हे पूजा कार्यासाठी तितकेच महत्त्वाचे मानले जाते व तांदळाचा उपयोग अन्नासोबतच क र्म कां ड यातही केला जातो. अक्षता नसणे म्हणजे पूजा अ पू र्ण मानली जाते. घरात तांदूळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो. शुक्र ग्रह हा भौतिक सुख आणि समृद्धीचा घटक मानला जातो.

त्यामुळे कदाचित तांदुळ संपल्याने घरात पैशासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. तांदूळ घरात कधीही संपू देऊ नका. जर घरात तांदूळ संपण्यापूर्वी आणून ठेवल्याने घरात नेहमी पैसे जोडून राहतात. तर आता आपल्या लक्षात आले असेलच की या चार गोष्टी कधी स्वयंपाक घरात संपू देऊ नये.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *