नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला. या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते. रामनवमीतील काही खास उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात. पाहा हे कोणते उपाय आहे ते.
यावर्षी 10 एप्रिल 2022 रोजी रविवारी रामनवमी साजरी होणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार,
या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचा जन्म झाला. या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते. रामनवमीतील काही खास उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात. पाहा हे कोणते उपाय आहे ते…
धनलाभाचे योग मिळवण्यासाठी
कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळा भोग अर्पण करा. केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा. यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील. या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच, पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात. ज्याने घरात सुख-समृद्धी येते. धन-संपत्ती वाढते.
या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात
कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा 108वेळा जप करा
“श्री राम राम रामेती
रामे रामे मनोरमे
सहस्रनाम तत्तुल्य
श्री राम नाम वरण”
या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो. भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात. त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे. ते खूप शुभ असेल. रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र इत्यादी दान करा. ते खूप शुभ असेल.
माता सीतेच्या चरणी सिंदूर लावावा
रामनवमीच्या दिवशी सिंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा सिंदूर सीता मातेच्या चरणी लावा. नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या. रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा (सकाळी, दुपार, संध्याकाळ) केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते.
अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी
या दिवशी प्रभूची पूजा करून श्री राम स्तुतीचा पाठ करा. या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता. असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात.
तुम्ही दक्षिणावर्ती शंखाने श्री रामाला अभिषेक करा. हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करेल.
सुखी वैवाहिक जीवनासाठी
या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.