कर्क राशींच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आणि उपाय..

Uncategorized

मित्रांनो,प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हे वेगवेगळे असते. ज्योतिषशास्त्राच्या मते, राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ठरलेला असतो. काही राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात. तर काही राशीचे लोक तापट किंवा रागीट स्वभावाचे असतात. आज आपण कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो, हे जाणून घेणार आहोत.

1) ज्योतिषमध्ये राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क. या राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशीचा स्वामी चंद्र आहे.कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात. या राशीचे लोक खूप प्रामाणिक आणि दयाळू स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वभावात विरोधाभास दिसून येतो. जर त्यांचा मित्र त्यांच्या मनाप्रमाणे वागत नसेल, तर हे लोक त्यांची निंदाही करू शकतात.
2) या राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात.त्यांना नेहमी समाजात आदर, सन्मान हवा असतो. या राशीच्या लोकांना कुणीही मूर्ख बनवू शकत नाही.कारण हे लोक खूप हुशार आणि चपळ असतात.
3) कर्क राशीच्या लोकांच्या लाजाळू स्वभावामुळे अनेक वेळा हे लोक आपले प्रेम व्यक्त करु शकत नाहीत. या राशीचे लोक त्यांच्या नात्यासाठी समर्पित असतात. इतरांचे मन जाणून घेण्याचा गुण त्यांच्यात असतो. हे लोक मनमिळाऊ, कौटुंबिक, प्रेमळ आणि मेहनती असतात.
4) ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व देतात. कुटुंबाला हे लोक सर्वस्व मानतात. पार्टनरसाठी हे लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. या राशीच्या लोकांना आपल्या पार्टनरकडूनही भरपूर अपेक्षा असतात. या राशीचे लोक रोमँटिकसुद्धा असतात.
5) या राशीचे लोक खूप भावनिक असल्यामुळे त्यांच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टी ते कधीच विसरत नाहीत. प्रामाणिक स्वभावामुळे त्यांना खोटे बोलणारे लोक अजिबात आवडत नाहीत. हे लोक स्वभावाने दृढनिश्चयी असतात. त्यामुळे त्यांना स्वनीतीनुसार आयुष्य जगायला आवडते.
6) चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो, अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकटयावरच आहे की काय, असे नर्वस होतात. जशी अमवास्या पोर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते, तशी तुमच्या मनाची अवस्था असते.
7) या राशाचे लोकं आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात. ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात. या लोकांसाठी, त्यांचे नाते खूप महत्वाचे असते.
8) हे लोकं थोडे गर्विष्ठ असतात आणि त्यांच्या तत्त्वांवर जगतात. ते आतून मऊ आणि बाहेरुन खूप कडक असतात. हे लोकं कुशल मुत्सद्दी आणि हुशार असतात.कर्क राशीचे लोकं शक्ती पेक्षा युक्तीने काम करतात. हे लोकं दिलेला शब्द पाळतात.
9) जर आपण कर्क राशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते, परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत.दुसरीकडे, कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात. या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
10) कर्क राशीच्या प्रभावामुळे हे लोकं खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात. भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण आहेत. त्यांचे मन खूप वेगाने चालते पण हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात. काही प्रकरणांमध्ये, त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते. ते अतिशय साधे, संवेदनशील आणि ते अतिशय साधे, संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत.
11) रोमँटिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात. भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजासहजी विसरत नाही. कर्क राशीचा स्वभाव स्वावलंबी, प्रामाणिक आणि न झुकणारा असतो. कर्क राशीच्या लोकांना न्याय मिळवणे किंवा इतरांना न्याय देणं आवडतं. या राशीच्या लोकांची स्मरणशक्तीही खूप तीक्ष्ण असते. याशिवाय कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी आसक्ती असते.
12) अशा व्यक्ती सामाजिक उपक्रमात भाग घेतात आणि देशभक्तही असतात. त्यांचे हे गुण चारचौघात वेगळी छाप सोडतात. कर्क राशीचे लोक त्यांच्या जीवनसाथीशी एकनिष्ठ असतात. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे शब्दात कौतुक कसे करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी त्यांची मुले आणि कुटुंबातील सदस्य सर्वात महत्त्वाचे आहेत.
13) कर्क राशीचे लोक मैत्रीमध्येही विश्वासू असतात. ते साधे आणि दयाळू स्वभावाचे मानले जातात. हे लोक आपल्या मित्रांसोबत मनातील सर्वात खोल गोष्टी शेअर करतात.
14) तुमच्या ओठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळूवार पणे येतो, म्हणून तर तुम्ही हळवे असतात. जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर, तो अगदी हळूवारपणे अनुभवत असता. तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते. आपले घर आपला संसार या संबंधीत लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्र-दिवस धडपडत असता.
15) तुम्ही खूपच हळवे असता. दुसऱ्याचे दुःख पाहुन तुम्हाला दुःख होते. तुमच्या डोळयामध्ये पाणी येते. एवढे तुम्ही हळवे कनवाळू मायाळू असतात.
16) तुम्ही खूपच भिडस्त स्वभावाचे आहात. तसे पाहीले तर तुम्ही खूप मुडी स्वभावाचे आहात. पण जरी तुमच्या मुड जाण्याच्या मागे मोठे ठोस कारण असले तरी सुध्दा तुम्हाला सर्वच भावना शब्दात मांडायला येत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाणून घेता येत नाही. त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने वागा.
17) या राशीचे लोक कला आणि संगीत प्रेमी असतात. यासोबतच ते तत्त्वज्ञ,कवी, लेखक, उच्चपदस्थ डॉक्टर आणि संशोधकही असू शकतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. पण त्यातून ते सहज बाहेर पडतात.त्यांना बदल आवडतात. त्यांच्या कष्टातून त्यांना आवश्यक सुखसोयी मिळतात. हे लोक कामाच्या ठिकाणी खूप कलात्मक असतात.
18) हे लोक त्यांचे प्रेम व्यक्त करु शकत नाहीत, परंतु ते त्यांचे प्रेम प्रामाणिकपणे बजावतात आणि त्याबद्दल एकनिष्ठ राहतात. मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी कर्क राशीचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे प्रेम आणि विवाहासाठी या राशींना प्राधान्य द्या अशाप्रकारे ही काही कर्क राशीबद्दलची वैशिष्ट्ये आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *