या उपायाने अडकलेले पैसे परत मिळवा..

Uncategorized

तुझे पैसे कुठे अडकलेत का? म्हणजे तुम्ही मदत म्हणून कोणाला तरी पैसे दिले? आणि तो माणूस आता परत करायचं नावच घेत नाही किंवा तुम्ही एखाद्याचं काम करून दिलं पण त्याबद्दलचा मोबदला तुम्हाला दिलेला नाहीये? मित्राला म्हणून पैसे दिले आज ना उद्या तू परत करेल असं वाटलं. पण तोही आता ओळख दाखवत नाहीये.

असं जर तुमच्या बाबतीत होत असेल आणि कुठल्याही कारणाने तुमचे पैसे कुठे तरी अडकले असतील तर परत मिळावे म्हणून वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिष शास्त्रानुसार काय उपाय करता येतील चला जाणून घेऊया.. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रमध्ये पैसे अडकले तर ते परत कसे मिळवायचे या संदर्भात काही उपाय सांगितले.

त्यातले काही उपाय इथे मी तुम्हाला सांगणार आहे. जो उपाय तुम्हाला आवडेल तो उपाय तुम्ही करून बघू शकता. सगळ्यात पहिला उपाय आहे गणपती बाप्पाची पूजा करा. जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर रोजच गणपती बाप्पाची पूजा करा. श्रीगणेशाची पूजा केल्याने तुमचे थकीत पैसे परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही लवकर फेटते, असं म्हटलं जातं.

आता दुसरा उपाय जर तुमचा आराध्यदैवत बजरंग बली असेल, तर तुम्ही बजरंग बलीची पूजा करायला हवे. हनुमानाला लाल वस्त्र अर्पण करा आणि मोहरीच्या तेलात शेंदूर मिसळून तो हनुमानाला लावा. त्यामुळे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि साधा सोपा उपाय म्हणजे कुलदेवतेची पूजा करणे.

त्यामुळे सुद्धा आपल्या अडकलेले पैसे आपल्याला परत मिळतात. पण हो कुलदैवतेच्या पुजेबरोबर तुम्ही काही दानधर्म देखील करायला हवा. तुमचं पैसे वर्षानुवर्ष परत मिळत नसतील तर आणखीन एक प्रभावी उपाय आहे. रोज स्नानानंतर झाल्यानंतर गायत्री मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा, असं केल्याने तुमची थकीत बाकी तुम्हाला परत मिळू शकते.

हळूहळू पैसे मिळण्याचे मार्ग सापडतात. आणखीन एक उपाय म्हणजे श्रीसूक्त पठण करणे. श्रीसूक्त इतका प्रभावी स्तोत्र आहे की त्याच्या तुमच्या अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत येतील. आता जर तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर आम्ही दुसरा उपाय आहे ना. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिकटून ठेवावं.
3-4 महिन्यातच येणे असलेली रक्कम परत मिळते. तुम्हाला वेगवेगळे उपाय सांगितले यातला कुठलाही उपाय करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *