गरोदर स्त्रियांची चोर ओटी कधी व कशी भरावी? एकांतात का भरतात ही ओटी?

Uncategorized

मित्रांनो, बाळ घरी जन्माला येणार म्हटलं की घरचे सगळेच वातावरण अगदी आनंदाचे असते. घरातील प्रत्येक जण हा गरोदर स्त्रियांची देखभाल करण्यात व्यस्त राहतात. गरोदर महिलेला काय खावंसं वाटतं याकडे सर्वांचेच लक्ष असते. सर्वांनाच अगदी सुंदर बाळ जन्माला यावं असं वाटतच असतं. त्यासाठी ते गरोदर स्त्रियांची विशेष अशी काळजी देखील घेत असतात.

मित्रांनो गरोदर महिलांची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील महाराष्ट्रीयन लोक करतात. ही पद्धतच आहे. शक्यतो करून गरोदरपणाचे तीन महिने पूर्ण झाले की, त्या गरोदर महिलेची चोर ओटी माहेरच्यांकडे म्हणजेच आईने भरायची पद्धत आहे आणि यालाच चोर ओटी म्हटलं जातं.

तर मित्रांनो ही चोर ओटी नक्की केव्हा आणि कशी भरायची आहे तसेच ही ओटी एकांतात का भरली जाते याचीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आपल्याकडे बाळ होणार आहे हे तीन महिन्यांच्या आत कोणालाच सांगत नाहीत. परंतु या मागचं कारण शक्यतो करून कोणाला माहित नाही.

तर मित्रांनो हे तीन महिन्याच्या आत कोणाला न सांगण्यामागचा हेतू असा असतो की, या महिन्यामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित होऊ द्यायचे असते. यामुळे मग चोर ओटी ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये भरली जाते. यामुळे कोणताही मोठा समारंभ देखील करत नाहीत आणि यामुळेच याला चोर ओटी असं नाव पडलं आहे.

चोरोओटी भरली की मग सातव्या महिन्यापर्यंत कोणाकडूनही ओटी त्या गरोदर महिलेची भरली जात नाही. मग नंतर डोहाळे जेवणाला सर्वांकडून ओटी भरून घेतली जाते.

चोरओटीचा कार्यक्रम हा कोणालाही कळू न देता घरच्या घरात करावा लागतो. तसंच यावेळी दिलेले पंचामृत म्हणजेच दही, दूध, तूप, मध आणि साखर यांचे एकत्र मिश्रण मुलीला देण्यात येते. ओटी भरल्यावर याने तोंड गोड करून हा कार्यक्रम केला जातो. तीन महिन्यापर्यंत अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणींनाही याबाबत काहाही सांगितले जात नाही. त्यामुळेच केवळ अगदी कुटुंबातील व्यक्तींसह हा चोरओटी कार्यक्रम केला जातो.

सहा महिने पुर्ण झाल्यानंतर सातव्या महिन्यात गरोदर महिलांनी सुंदर साडी नेसून साडीच्या पदरामध्ये तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी भरली जाते. तीन महिन्यांनंतर साधारण सातव्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची ओटी भरण्याची पद्धत नाही.

ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे हा त्यामागचा हेतू असतो. आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते.आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी चोरओटी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा.

ओटी म्हणजेच बेंबीखालील गर्भाशयाची जागा होय. ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळणे, सुखप्राप्ती होणे असा आहे. चोरओटी भरली की, बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असे मानले जाते.

ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळं, फुलं ही संततीचे सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येते. बाळाची फळाफुलाप्रमाणे वृद्धी होवो असे सांगण्यात येते. चोरओटी ही तिसरा महिना चालू झाल्यावर माहेरी भरण्यात येते. जर माहेरी चोर ओटी भरण्याची पद्धत नसेल तर मोठी बहीण, मावशी यादेखील ओटी भरू शकतात. आजकाल तर आपणाला सासरी देखील चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम पाहण्यास मिळतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे गरोदर महिलांची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम हा सगळीकडेच आपणाला पाहायला मिळतो आणि अशाच पद्धतीने चोर ओटी भरली जाते. यामुळे बाळ हे सद्गुनी, सुसंस्कारी, सुंदर जन्माला येते. तर मित्रांनो अशा प्रकारे ही चोर ओटी भरली जाते आणि वरील सांगितल्याप्रमाणे चोरओटी मध्ये ही फक्त कुटुंबाच्या व्यक्तीच सहभागी होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *