कमी बोलणाऱ्या व्यक्तींनी जरा इकडे लक्ष द्या.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपण सगळे आचार्य चाणक्य यांना महान ज्ञानी, अर्थ कुशल आणि महान अर्थतज्ञ म्हणून ओळखतो. चाणक्य नीति याच मुळे सर्वश्रेष्ठ मानली जाते , कारण आचार्य चाणक्य यांनी मनुष्यास चेतावनी देत स्पष्ट भाषांमध्ये नीतीची रचना केली आहे.

जे सर्वसाधारण मनुष्य सहजतेने वाचून समजून जीवनात सफलता प्राप्त करू शकतो. अशाचप्रकारे चाणक्य यांनी जास्त आणि कमी बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल अत्यंत महत्वाचे ज्ञान दिले आहे.

चाणक्य यांच्या मते जास्त बोलणारी लोकं कावळ्या प्रमाणे असतात. तसेच कमी बोलणाऱ्या व्यक्ती कोकिळे प्रमाणे असतात. कावळ्याचा कर्कश्य आवाज कोणालाही आवडत नाही तर कोकिळेचा मंजुळ आवाज मात्र सर्वांनाच प्रिय असतो.

अशाच प्रकारे चाणक्य यांनी आपल्या नीती ग्रंथामध्ये कमी बोलणाऱ्या व्यक्तींसाठी वृक्षाचे देखील दाखले दिले आहेत. वृक्षाच्या या उदाहरणाने कमी बोलणारे लोक खूप काही शिकू शकतात. येणाऱ्या प्रत्येक संकटांना अगदी सहजतेने तोंड देऊन ते संपवू शकतात.

तस तर कमी बोलणे चांगली गोष्ट मानली जाते. हे एक बुद्धिमान आणि समजदार असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण मानले जाते. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळेच जगामध्ये अनेक असंख्य लोक आहेत आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत तितकीच निराळी आहे.

काही लोक जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना पसंत करतात तर काही लोक कमी बोलणाऱ्या व्यक्तींना! कमी बोलल्यामुळे अनेकदा व्यक्तींना आपला हक्क देखील गमावून बसावा लागतो. जाणून घेऊयात अशा लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

असे लोक चेष्टामस्करीचा विषय बनतात. यांची नेहमीच थट्टा केली जाते. कमी बोलण्याच्या स्वभावामुळे हे पलटून कधीही उत्तर देत नाहीत किंवा असं करणे त्यांना पसंत नसते. तसं तर यांचा मजाक उडवणारे लोक स्वतःच कोणत्या कामाचे नसतात. परंतु कमी बोलणारे लोकं वादविवाद करणे पसंत करत नाहीत.

कमी बोलणारी व्यक्ती स्वतःच्या हक्कासाठी कोणाशीही लढू शकत नाही. ज्यामुळे अनेकदा त्यांना स्वतःचा हक्क देखील सोडावा लागतो. त्याचमुळे चाणक्य सांगतात की प्रत्येक ठिकाणी गप्प बसणे हे मूर्खता आणि कमजोर असल्याचे लक्षण आहे.

जिथे ज्या पद्धतीने ज्या प्रकारे वाणीची आवश्यकता आहे त्या पद्धतीने बोललेच पाहिजे. कमी बोलणारी लोक आपला राग मनामध्येच दाबून टाकतात. यांना राग व्यक्त करता येत नाही. कोणालाही अपशब्द बोलत नाहीत आणि गुपचूप सर्व काही सहन करत राहतात.

राग आतच दाबून टाकल्यामुळे ह्यांची घुसमट होऊन आतल्या आत मानसिक त्रास होत राहतो. अनेकदा कमी बोलणाऱ्या लोकांना स्वार्थी संबोधले जाते. परंतु प्रत्यक्षात हे व्यक्ती चांगले आणि दयाळू स्वभावाचे असतात.

असे व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संकटात पडू इच्छित नाही त्यामुळे दुसऱ्या पासून लांब राहणे पसंत करतात. चाणक्य यांनी कमी बोलणारे व्यक्तींची तुलना कोकिळेशी तर केलीच आहे.. कोकीळा तोपर्यंत मौन धारण करते जोपर्यंत तिची मधुर वाणी फुटत नाही.

चाणक्य यांच्यानुसार मनुष्याला कधीही सरळ राहून चालत नाही. जंगलामध्ये सरळ वृक्षच कापली जातात तर वाकडे तिकडे असणारी झाडं सोडून दिली जातात. याचा अर्थ असा की अधिक मौन बाळगणे उचित नाही.

आवश्यकता पडेल त्याप्रमाणे मनुष्याला आपली वीरता दाखवावीच लागते. आवश्यकता नसल्यास मुर्खा प्रमाणे वाचाळ पणे बडबडू नये. आपल्या वाणी चा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

कधी बोलले पाहिजे आणि कधी गप्प बसले पाहिजे यांचा समन्वय प्रत्येकाला साधताच आला पाहिजे. अशाप्रकारे आचार्य चाणक्य यांनी कमी बोलणाऱ्या व्यक्तींना सल्ला दिलेला आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *