नमस्कार मित्रांनो,
स्वप्नात या 5 गोष्टी दिसणं शुभ मानलं जातं. मित्रांनो रात्री गाढ झोपेत स्वप्न पडणं ही सामान्य बाब आहे. क्वचितच कुठली व्यक्ती असेल जिला स्वप्न पडत नाहीत. ही स्वप्न आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देतात. काही स्वप्न अशी असतात जी भविष्यातील चांगले घटनांची चाहूल असतात. काही वेळा स्वप्नात प्राणी दिसणं हे देखील खूप शुभ मानला जात.
या स्वप्नांचा अर्थ असतो की, येत्या काळात तुम्हाला धनलाभ होणार आहे. चला तर मग पाहूया असे कुठले प्राणी आहेत जे स्वप्नात दिसल्याने धनलाभ होतो. हे प्राणी स्वप्नात दिसत असतील तर धनलाभ होणार हे नक्की.
स्वप्नात घोडा दिसणे. स्वप्नात घोडा दिसणं सौभाग्याचं प्रतीक असतं. स्वप्नशास्त्रात घोड्याशी संबंधित अनेक प्रकारच्या स्वप्नांनाबाबत सांगितलेल आहे. जर घोडा धावताना दिसला तर ते प्रगतीचे लक्षण असतं. स्वप्नात जर घोड्याची नाळ दिसली तर तेही खूप चांगलं असतं. तुम्ही स्वतः घोडेस्वारी करताना दिसला तर ती खूप शुभ असतं. तुमच्या हाती लवकरच पैसे खुलखुळणार याचा हा संकेत असतो.
स्वप्नात मधमाशी दिसणे. स्वप्नात मधमाशांचे येणं खूपच शुभ मानले जात. हे तुमच्या सौभाग्याचा संकेत देतात. जर मधमाश्या स्वप्नात तुम्हाला तुमच्या चौहूकडे घोंगावताना दिसल्या तर तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत असा याचा अर्थ आहे. मात्र जर तुम्ही मेलेल्या मधमाशा पाहिल्या तर ते शुभ नाही. असं म्हणतात की, आपल्याला आजूबाजूच्या लोकांवर बिलकुल विश्वास ठेवायला नको.
स्वप्नात मुंग्या दिसणे. स्वप्नात मुंग्या दिसणे तुमच्या कार्यक्षेत्राशी आणि नोकरीशी संबंधित गोष्टी दर्शवितात. जर या मुंग्या नैसर्गिक वातावरणात दिसल्या आणि खूप मोठ्या संख्येने दिसल्या तर तो शुभ संकेत असतो. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात आणि तो विचार खरच चांगला आहे.
त्यामुळे तुमच्या आयुष्यात सफलता निर्माण होणार आहे. पण जर मुंग्या स्वप्नात तुमच्या अंगावर चढताना दिसल्या तर ती चांगली बाब नाही. याचा अर्थ तुम्हाला कार्यालयात त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
स्वप्नात मोर दिसणे. मोर स्वप्नात शुभसंकेत घेऊन येतो. मोर नाचताना दिसला तर तुमचा आनंद द्विगुणित होणार असतो. तुमच्यावर सुखाची बरसात होणार असते. तुम्हाला कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये यश मिळणार असतं. मात्र स्वप्नात जखमी अवस्थेतील मोर दिसला तर ते मात्र वाईट असतं. याचा अर्थ हा सांगितला जातो की, अतिविश्वासामुळे तुमचं कुठलं तरी काम खराब होणार आहे.
स्वप्नात हत्ती दिसणं. स्वप्नात हत्ती दिसल्यास पैशांच्या अनुषंगाने ते खूपच शुभ मानला जात. स्वप्नात हत्ती दिसणे लक्ष्मी देवीच्या आगमनाची चाहूल आहे. हत्ती हे वैभवाचे प्रतिक आहे. स्वप्नात हत्तींचा कळप दिसला तर तुमच्यासाठी तो धनवृद्धीचा संकेत असतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.