हे फुल आयुर्वेदातील चमत्कार आहेत. मूळव्याध, उष्णता, शुगर, लघवीला जळजळ, उन्हाळी किडनी साफ

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

पळस ही अशी औषधी वनस्पती आहे जिच्या अंगी असलेल्या औषधी गुणांमुळे अनेक आजार बरे होत असतात. या पळसाची फुले सुद्धा तितकाच उपयोगी असा आहे वसंत ऋतूच्या सुरुवातीला पळत आपलं लक्ष वेधून घेतो. कारण म्हणजे त्याची ही फुले.

आयुर्वेदातील अत्यंत शक्तिशाली असा याचा उपयोग होतो. त्यांचा रंग आपलं लक्ष पटकन वेधून घेतो. यामुळे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट फायर म्हणून सुद्धा या फुलांना ओळखले जाते. उष्णतेपासून, लघवीच्या समस्यापासून ते आपल्या कामोत्तेजना वाढीसाठी सुद्धा ही पळसाची फुले उपयोगी ठरते.

फुलांचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना उष्णतेचा त्रास जाणवत असतो. अंगातून घाम येणे, लघवीला जळजळ होणे, उन्हाळी लागली असेल, लघवी होताना आग होत असेल अशा या तक्रारी उद्भवत असतात.

अशावेळी पळसाचे फुल रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि सकाळी हे पाणी गाळून घ्यायचा आहे. थोडीशी खडीसाखर आपल्या त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि याचे सेवन आपल्याला सकाळी करायचे आहे.

यामुळे उष्णतेच्या विकारावर आपल्याला लवकर आराम मिळतो. शिवाय अनेक जणांचे पोट साफ होत नसल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत असतो. अशावेळी पळसाची फुले वाळवून त्याची पावडर तयार करून ठेवायची आहे. एक चमचा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे.

यामुळे तुमचे पोट साफ होते आणि मूळव्याधीचा त्रास सुद्धा कमी होते आणि कोम गळून पडते. पळसाच्या फुलांचा जर काढा पिला तर शुगर जी आहे ती नॉर्मल राहते. त्याशिवाय किडनी सुद्धा साफ होते. लघवीच्या सर्व तक्रारी दूर होतात. बॅक्टेरिअल इन्फेक्शन पासून सुद्धा आपले शरीर हे दूर राहत.

शरीरातील रक्त साफ राहते. ज्यामुळे त्वचेचे विकार उद्भवत नाहीत. शारीरिक दुर्बलता, कमजोरी घालवायचे असेल अशावेळी या फुलांची एक चमचा पावडर एक ग्लास दूध आणि थोडी खडीसाखर मिक्स करून प्यायचे आहे. यामुळे कमजोरी दूर होते. अत्यंत अनेक औषधी गुणांचा पळसाचे फुल आहे.

पळसाची फुले या दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे दिसून येतात. निसर्गाचा असा एक चमत्कार पळसाचे फुल आहे. हे आवर्जून या फुलांचा औषधी गुणांचा लाभ घ्यावा. ज्यांना अशाप्रकारच्या तक्रारी आहेत त्यांनी मात्र नक्कीच हे पळसाची फुलं साठवून ठेवावीत. वाळवून त्याची पावडर तयार करून वर्षभर वापरण्यासाठी आपल्याला साठवून ठेवता येते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *