दुधाचा हा पदार्थ स्मरण शक्ती दुप्पट करतो, 7 दिवस खाल्याने डोळ्यांची दिसण्याची क्षमता वाढते.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

सध्या बाल अवस्थेतील आणि किशोरवयीन मुला मुलींची स्मरणशक्ती कमजोर झाल्याचे आपण पाहतो. याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर एकाग्रतेवर दिसून येतो. मेंदूच्या नसा आणि स्नायू कमजोर झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होत असते आणि असे कमकुवत स्नायु मजबूत बनवून मेंदूच्या नसाना,

नाड्याना उत्तेजित करण्यासाठी आपण अगदी घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकतो. असाच सोपा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. जो बुद्धिमत्ता वाढवण्याबरोबरच डोळ्यांची दृष्टी देखील वाढवण्यात मदत होते.

आपल्या घरात किंवा आपल्याला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या फक्त तीन वस्तूंचा वापर करून हा घरगुती उपाय कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा हे आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे लोणी.

लोणी घरच्या घरी आणि देशी गाईच्या दुधापासून बनवलेले असेल तर असे लोणी खूप गुणकारी असते. लोणी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, शरीर दुर्बलता नाहीशी होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते, थायरॉइडचा त्रास कमी होतो. याशिवाय या कॅल्शियममुळे हाडे मजबूत बनतात आणि विशेष म्हणजे मेंदूचे स्नायू देखील बळकट होतात.

आपण साधारण एक चमचा एवढी लोणी एक वेळच्या वापरासाठी घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळीमिरी. आपल्याला स्वयंपाक घरात काळीमिरी मसाल्याच्या पदार्थांमध्ये सहजपणे उपलब्ध होते. काळेमिरे एका विशिष्ट प्रमाणात खालेने ताणतणाव आणि डिप्रेशनपासुन आपला बचाव होतो.

याशिवाय यामधील पिपेरियन नावाच्या अँटीऑक्सीडेंटमुळे मेंदूचे स्नायू, नसा मजबूत बनतात. आपण या काळेमिरेची बारीक पावडर बनवून घ्यायचे आहे. यामधील फक्त पाव चमचा येवढी पावडर आपणास घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक खडीसाखर.

खडीसाखर खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपण मोठ्या आकाराचे खडीसाखर घेऊन बारीक पावडर तयार करायचे आहे. यामधील 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार खडीसाखर एकवेळच्या उपायासाठी घ्यायचे आहे आणि हे सर्व घटक चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहे.

मित्रांनो एकाग्रता आणि डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी सोपा व्यायाम प्रकार तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या हाताच्या अंगठ्याकडे एकटक बघून हळूहळू तो डोळ्यापासून लांब न्यायचा आहे आणि पुन्हा पुन्हा हळूहळू डोळ्याजवळ आणायचा आहे.

असे दिवसातून तुम्ही दोन-तीन वेळा अवश्य करा आणि आपण तयार केलेले मिश्रण सकाळी नाष्ट्यानंतर हळूहळू खाल्ले तरी चालेल. लहान मुलांना यामधील अर्धा चमचा द्यावा हा उपाय एक आठवडा नियमित करून नंतर एक आठवडा थांबून पुन्हा करावा असे केल्याने तुमची स्मरणशक्ती दुप्पट आणि डोळ्यांची दृष्टीमध्ये वाढ होण्यास मदत होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *