तुम्ही कधी विचार केलाय का कि, भगवान श्रीकृष्णांनी बासरी हे वाद्य त्यांच प्रिय वाद्य म्हणून का निवडला असावं? वाद्य तर अनेक आहेत, पण भगवान श्रीकृष्णांना बासरी प्रिय आहे. कारण बासरी शिवाय आपण भगवान श्रीकृष्णांच्या चित्राची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर बासरी इतकी महत्त्वाची आहे का? बासरीचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो ?
आपण घरात एखादी बासरी ठेवली तर त्याचे काय लाभ आपल्याला होतील. चला जाणून घेऊया..भगवान श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा बासरी वादन करत असेल तेव्हा तेव्हा समजतं सृष्टीबरोबर गोपिका सुद्धा त्या बासरीच्या सुरांवर स्वतःचा देहभान हरपून बसत असत. बासरीला भगवान श्रीकृष्णांनी ओटी लावले तेव्हापासून या वाद्याला अतिशय महत्त्व आले.
बासरीचे अस्तित्व हे भगवान श्रीकृष्णांच्या अस्तित्वाची खूण मानली जातात, म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी लावावी असे सांगितले आहे. तसेच घरांत बासरी वादन ऐकावं असं सुद्धा सुचवले आहे. त्यामागे नेमके कारणे काय? बासरीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जातात, बासरीचे सूर सकारात्मक वातावरण निर्मिती करतात आणि वातावरणात विशिष्ट प्रकारची प्रसन्नता व्यापून राहते.
बासरीचे सूर मानवी स्वरांशी तसंच पशु पक्षांच्या आवाजाची हुबेहुब मेळ खातात, म्हणूनही अनेक संगीत प्रकारांमध्ये बासरीची धून समाविष्ट केलेली असते. बांबूचे जाळे जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा बांबूपासून बनलेल्या बासरीला देखील आहे. ज्यांना नोकरी अनेक अडचणी येत असतील त्यांनी घरात बासरी लावावी असं सांगितलं जात.
चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैशाची अडचण भासत नाही. सोन्याची बासरी घरात असेल तर घरात माता लक्ष्मी सदैव राहते. तसेच त्या घरामध्ये पैसा कधीच कमी पडत नाही, असं वास्तु शास्त्र सांगतं. बांबूच्या झाडापासून तयार केलेली बासरी तात्काळ प्रभाव दाखवते.
ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही किंवा शिक्षण व्यवसाय नोकरी या सगळ्यात भागांमध्ये अडचणी येत असतील त्या लोकांनी आरामाच्या खोलीच्या दरवाज्यावर दोन बासऱ्या लावाव्या, त्यांच्या सर्व समस्या सुटतील.तसेच वास्तुदोष असेल 2 दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजावर 2 बासर्या लावणे फायद्याचे ठरते.
ज्यांना अपार कष्ट करूनही नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल अशा लोकांनी आपल्या कार्याठिकाणी तरी धातू मिश्रित बासरी लावावी, यामुळे अनेक फायदे होतात. नवीन व्यवसाय सुरु करताना तिच्या वास्तूच्या कोणत्याही एका भिंतीवर बासरीची एक जोडी लावा, त्यामुळे तुमच्या कोणत्याही कार्यात अडचणी येत नाही.
ज्या घरात बासरी असते तिथे प्रेमाला कमतरता नसते म्हणूनच वैवाहिक जीवनातील अडचणी व उपाय म्हणून सुद्धा घरात बासरीला असा सल्ला दिला जातो. तुमच्या आयुष्यात सुद्धा एखादी समस्या असेल तर तुम्ही घरामध्ये बासरी लावून बघा. नक्कीच भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटतील. तर तुम्हाला बासरी बद्दलची माहिती होती का? नक्की सांगा..
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.