अंत्यसंस्काराच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ का उच्चारला जातो?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू देखील हा असतोच. मग त्यांना त्याच्या कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकामध्ये जागा मिळत असते. तर मित्रांनो जेव्हा माणूस मृत्यू पावतो त्यावेळेस त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है असे शब्द बोलले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे आपणाला पाहायला मिळतेच.

परंतु मित्रांनो राम नाम सत्य है हे शब्द का उचारायचे असतात या मागचे मात्र कारण कोणालाही माहित नाही. तर मित्रांनो याचा जप का करतात? यामागचे कारण कोणते आहे? याविषयीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो राम नाम सत्य है या नावाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाव जपल्यासारखे असते.

या पृथ्वीतलावर जन्माला आलेला मनुष्य आपले शरीर सोडून नवीन प्रजातीत प्रवेश करतो. पुढच्या जन्मी तो कोणत्या रूपात जन्म घेईन हे कोणालाच माहीत नसते. तरीही माणूस आयुष्यभर भ्रमात गुरफटून फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो. आपल्या आयुष्यामध्ये कितीही काबाडकष्ट करून पैसा कमावला तरी तो माणूस मृत्यूनंतर रिकाम्या हाताने जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, मनुष्याला पुढील जन्मात त्याच्या कर्मानुसार जागा मिळत असते. तुम्ही पहिलच असेल की लोक मृतदेह घेऊन जाताना अंत्यसंस्काराच्या वेळी फक्त राम नाम सत्य है चा जप करतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, रामनामाचा जप केल्यानेच जीवनात मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. रामायणातही राजा दशरथाने शेवटच्या क्षणी राम-राम म्हणत मोक्ष मिळवला. शास्त्रानुसार राम नामाचा जप केल्यास तुमचा त्रास कमी होतो.

तर मित्रांनो अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा रामाचे नाव घेतले जाते. तेव्हा हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना आणि जवळीकांना हे कळवाचे असते की, मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही. माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यावर एकटाच जातो. तो आत्मा या जीवनचक्रातून मुक्त होतो.

सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो.त्यामुळे त्या मृत शरीराला काहीच अर्थ नसतो. रामाचे एकच नाव आहे जे सत्य आहे. राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव प्रत्येकाला होते. तर मित्रांनो म्हणूनच कोणतीही व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है याचा जप केला जातो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *