गुरू उदय होताच या राशींना मिळणार बक्कळ पैसा..

राशिभविष्य अध्यात्मिक

ज्योतिष शास्त्रानुसार देवांचे गुरू बृहस्पती एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांचा ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, परोपकार, सुखसमृद्धीवर दिसून येतो. 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी बृहस्पती मीन राशीतुन मेष राशीत प्रवेश करणार आहे.

27 तारखेला गुरु मेष राशीचा उदय होणार आहे. गुरूचा उदय होतास शुभकार्याला सुरुवात होईल. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार गुरूचा उदयामुळे आणि लोकांच्या जीवनात आनंद घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी..

1. मेष रास: ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा पहिल्या घरात गुरू उदय होत आहे. या राशीमध्ये बृहस्पती नवव्या स्थानाचे स्वामी आहेत त्यामुळे या नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गुरूच्या उदयामुळे तुम्ही करिअर मध्ये नवीन उंची गाठू शकतात. तर नोकरदार वर्गाला प्रमोशन सुद्धा मिळू शकते. व्यवसायातही भरपूर होण्याची शक्यता आहेत. या सोबतच तुम्हाला समाजात मानसन्मान मिळू शकतो.

2. मिथुन रास: या राशीच्या अकराव्या स्थानी गुरु उदय होणार आहे. त्याला इच्छा आणि समाधान मानले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी गुरूचा उदय शुभ ठरू शकतो. यासोबतच आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहेत.

3. कर्क रास: या राशीचा दहाव्या स्थानी गुरुचा उदय होत आहे, त्यामुळे तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होण्याची शक्यता आहेत. तर कष्ट करणार यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. व्यवसायात लाभ सुध्दा होऊ शकतो.

4. सिंह राशी: या राशीच्या लोकांसाठी गुरुचा उदय लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या नवव्या स्थानी गुरूचा उदय होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो आणि त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

5. धनु राशी: या राशीमध्ये गुरु पाचव्या भावात उगवत आहे. हे घर बुद्धिमत्तेचे आणि मुलांचे मानले जाते. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीतच लाभ मिळू शकते. अनेक दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. व्यवसायात थोडीशी अडचण येऊ शकते. परंतु वेळेनुसार सर्व काही ठीक होईल.

6. मीन राशी: या राशीच्या दुसऱ्या स्थानी गुरुचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत राहू शकते. याचं उत्पन्नाचे नवीन स्त्रोत घडू शकतात. व्यवसायातही नफा होऊ शकतो. शिवाय तुम्हाला कुटुंब वेळ घालवता येण्याची शक्यता आहेत..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *