देवी दूर्गेचे नऊ अवतार कोणते? नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या नवदूर्गेची पुजा केली जाते?

अध्यात्मिक माहिती

आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केले जातात. आपापसातील सर्व मतभेद विसरून प्रत्येक जण हा एकमेकांशी प्रेमाने बोलून प्रत्येक सण साजरे करीत असतात. त्यापैकी हिंदू धर्मामध्ये चैत्र नवरात्रिला देखील खूपच अनन्यसाधारण असे महत्त्व मानले गेलेले आहे. नवरात्रीची सुरुवात ही बुधवार 22 मार्च रोजी घटस्थापनेने होणार आहे. यावेळी चैत्र नवरात्र ही पूर्ण नऊ दिवसांची आहे.

चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा देखील केली जाते आणि यांनाच नवदुर्गा म्हणून देखील ओळखले जाते. तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवसाला मातेची विशेष असे रूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे आणि त्या विशेष रूपाची पूजा देखील केली जाते.

तर या नवदुर्गेचे नऊ अवतार नेमके कोणते आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या मातेची पूजा करायची आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार या संपूर्ण सृष्टीचा आधार शंकर आणि माता आदिशक्ती आहेत. जेव्हा जगात दानवांचा अत्याचार वाढला आणि सर्वत्र अधर्माचा प्रादुर्भाव झाला तेव्हा सर्व देवतांनी आदिशक्तीला आवाहन केले.

मग देवी दुर्गा प्रकट झाली आणि सर्व देवी-देवतांनी तिला आपली शस्त्रे आणि शक्ती दिली. पर्वतराज हिमालयाने तिला सिंह हे वाहनाचे रूप दिले. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री हा माँ दुर्गेच्या 9 अवतारांपैकी पहिला अवतार आहे.

देवी पार्वतीला शैलपुत्री म्हणतात. कारण तिचे वडील पर्वतराज हिमालय होते. यानंतर नवदुर्गेमध्ये देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी महागौरी आणि देवी सिद्धिदात्री आहे. 22 मार्च या चैत्र नवरात्रिमध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते 23 मार्चला नवरात्रीचा दुसरा दिवस येतो आणि या दिवशी ब्रह्मचारी मातेची पूजा केली जाते.

तसेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. नवरात्रीचा तिसरा दिवस 24 मार्चला आहे. 25 मार्चला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. 26 मार्च हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे.

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते. 27 मार्च हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.28 मार्च हा नवरात्रीचा सातवा दिवस आहे. 29 मार्च हा नवरात्रीचा आठवा दिवस आहे. तिला महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणतात. नवरात्रीचा नववा दिवस हा 31 मार्चला येतो आणि या नव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते.

तर अशा या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गा मातेची वेगवेगळ्या अवतारातील पूजा केली जाते आणि त्यांना विशेष असे महत्त्व देखील प्राप्त झालेले आहे. अगदी मनोभावे आपण मातेची पूजा केली तर आपल्या जीवनातून सर्व अडीअडचणी संकटे ही नक्कीच माता दूर करते आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढीस लागते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *