अधिक मासाचे महत्व आणि हा ३ वर्षातून एकदा का येतो ?

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच सण, उत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करीत असतात. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे आणि या सणांना हिंदू धर्मात खूपच महत्त्वाचे आणि विशेष स्थान दिले जाते. या सण उत्सवाच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आनंददायी असते. आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक जण एकमेकांशी गोडी गुलाबीने बोलत असतात.

अधिकमासाचे देखील खूपच विशेष असे महत्त्व आहे. या अधिकमासामध्ये हिंदूलोक धार्मिक पूजा तसेच धार्मिक कार्य उपवास, व्रत अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात.. अनेक मंत्र्यांचे जप देखील या महिन्यांमध्ये बरेचजण करीत असतात.

मित्रांनो आपले जे सण,व्रत, उत्सव असतात हे सर्व चंद्रावर आधारित असतात. तर ऋतू हे सूर्यावर आधारित असतात. विशिष्ट सण, उत्सव ,व्रत हे ठराविक ऋतूंमध्ये यावे यासाठी चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा ताळमेळ साधणं गरजेचे असते .पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 दिवस, 5 तास 48 मिनिटं व 46 सेकंद लागतात. यालाच ‘सौरवर्ष’म्हणतात. तर चंद्राला पृथ्वीभोवती बारा प्रदक्षिणा घालण्यास 354 दिवस, 8 तास, 48 मिनिटं आणि 34 सेकंद एवढा काळ लागतो. यालाच चांद्रवर्ष म्हणतात.

यामुळे दरवर्षी चांद्रवर्ष व सौरवर्ष यामध्ये अकरा दिवसांचा फरक पडतो. मित्रांनो, एका चांद्रवर्षात 360 तिथी येतात. तर एका सौरवर्षात 371 तिथी येतात. तरी या दोन्ही मधील अंतर वाढत जाऊ नये यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी चंद्र वर्षातील एक महिना अधिक धरला जातो आणि या महिन्याला अधिक मास असे म्हटले जाते.

मित्रांनो या अधिक मास महिन्यामध्ये अनेक व्रत, पूजा देखील केली जातात. या महिन्यांमध्ये जावयाला विष्णुरूप मानून त्याना या महिन्यांमध्ये बरेच जण हे आहेर करतात. तसेच सोने, चांदी असे दान देखील या महिन्यांमध्ये केले जाते. या महिन्यात धोंडे दान स्वरूपात देण्याची प्रथा आहे. यावरूनच याला “धोंडे” मास हे नाव पडले आहे.

या अधिकमास महिन्यामध्ये जावयांचे खूपच लाड केले जातात. त्यांचे गोड कौतुक केलेले आपणाला पहावयास मिळते. तसेच नवविवाहितांसाठी सासरहून अनेक भेटवस्तू देखील दिल्या जातात. आजकाल अधिक मासाला जावायला चांदीचे ताट दिले जाते. त्यात ३३ अनारसे देऊन त्यात दीप प्रज्वलित करून जावायला वाण देण्याची प्रथा आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे अधिक मास हा तीन वर्षांनी येतो आणि या महिन्यांमध्ये अनेक महिला आपल्या सौभाग्याचे दागिने म्हणजे जोडवी देखील नवीन खरेदी करीत असतात. या महिन्यांमध्ये जावयाला विशेष असे महत्त्व दिले जाते. तर असा हा अधिक मास तीन वर्षांनी येत असतो आणि याला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *