मकरसंक्रांती दिवशी ‘ही’ एक वस्तू घरात आणा

अध्यात्मिक

मित्रानो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण,उत्सव अगदी आनंदाने प्रत्येक जण साजरा करीत असतात. अनेक प्रकारचे व्रतवैकल्ये महिला करीत असतात. आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी अनेक प्रकारचे व्रत ते अगदी मनोभावे करीत असतात. ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहावे.

तर मित्रांनो प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व आहे. त्यातीलच एक सण म्हणजे मकर संक्राती. खूपच आनंदाने महिला वर्ग हा सण साजरा करीत असतात. मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो. या दिवशी अनेक गोड गोड पदार्थ तसेच वाण देण्याचे कार्यक्रम देखील सर्वत्र आपल्याला साजरे करताना दिसतात.

या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण दान केल्याने आपल्याला फळप्राप्ती होते. मकरसंक्रांती च्या दिवशी सूर्यदेव, भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ महाराज, देवी लक्ष्मी, आणि शिवाची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते. ह्या दिवशी सूर्यदेव शनिदेवाच्या राशी मकर मध्ये पदार्पण करतात. ह्या दोघांमध्ये वडील व मुलगा असे नाते आहे. मित्रांनो मकरसंक्रातीच्या दिवंशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद प्रत्येकाने घ्यावे.

तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या या दिवशी आपल्याला एक वस्तू खरेदी करून आणायचे आहे आणि ती वस्तू खरेदी करणे खूपच शुभ मानले गेले आहे. तर मित्रांनो ही एक वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायची आहे. तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे.

त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. तसेच झाडू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी तसेच धनलाभ देखील होतो.

तसेच मित्रांनो मकरसंक्रांती दिवशी सकाळी गाईला चारा किंवा एखादी पोळी चारावी. या दिवशी आपण खिचडी व तीळ असे दोन गोष्टी दान करावे. तसेच मित्रांनो या दिवशी तुम्हाला जर एखादा गरीब व्यक्ती भेटला तर त्याला तुम्ही कधी रिकामे पाठवू नका. काहीतरी त्याला नक्की दान करा.

तसेच, मित्रानो ह्या दिवशी झाडांना कोणत्याही प्रकारची आपल्याकडून इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.या दिवशी तुम्ही नवीन झाडे लावा. हे आपल्यासाठी खूपच शुभ मानले जाते. मित्रांनो हा दिवस म्हणजे नात्यातील दुरावा विसरून गोडवा निर्माण करणारा आहे. म्हणूनच ह्या दिवशी कोणताही वाद करू नये. घरी अगदी आनंदी वातावरण कसे राहील ह्याकडे लक्ष द्यावे.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील येणारी मकर संक्रात अगदी आनंदाने घालवा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी करणे अजिबात विसरू नका. कारण झाडू जर तुम्ही खरेदी केला तर माता लक्ष्मीचा कायम तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहील. तुमच्या घरांमध्ये सदैव लक्ष्मी माता वास करेल. त्यामुळे मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी ही वस्तू नक्की खरेदी करून आणा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *