3 एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस येण्याआधी करा स्वामींचे अभिषेक सोपी पद्धत

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

3 एप्रिल ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. मित्रांनो 3 एप्रिल येण्याआधी म्हणजेच स्वामी समर्थांचा प्रकट दिवस येण्याआधी आपण आपल्या घरातल्या स्वामींच्या मूर्तीचे अभिषेक नक्की करून घ्यावे.

अभिषेक कसे करावे? म्हणजे आपण घरातच राहून अभिषेक करू शकतो. घरातील महिला असेल, घरातले पुरुष असतील, कोणीही हे अभिषेक करू शकता. कोणताही एक दिवस निवडून आणि एक दिवस बाकी दिवस आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिवस येण्याआधी तर तुम्ही कोणताही दिवस निवडा गुढीपाडव्याचा दिवस निवडला तरी चालेल.

तुम्ही स्वामींच्या प्रकट दिवशी म्हणजे सकाळी जरी तुम्ही हे अभिषेक केले तरी चालते. परंतु अभिषेक स्वामींचे नक्की करावे. आता अभिषेक कसे करावे? तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या देवघरासमोर बसावे आणि खास म्हणजे अभिषेक करण्यासाठी स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही अभिषेक करू शकत नाही. आता अभिषेक कसे करावे? जर मूर्ती असेल तर आपण स्वामींच्या समोर म्हणजे आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. एक तामन किंवा ताट किंवा ताटली घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये पंचामृत करून घ्यायचे आणि वाटीमध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे.

एक चमचा जवळ ठेवायचे आहे. आता ताटात, तामनात किंवा ताटलीमध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस पंचामृत स्वामींच्या मूर्तीवर टाकायच आहे आणि एक एक वेळेस जेव्हा आपण पंचामृत टाकू तेव्हा तुम्हाला स्वामींचा मंत्र जप करायचा आहे.

तो म्हणजे श्री स्वामी समर्थाय नमः म्हणजे एक चमचाभर पंचामृत घ्यायच स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं आणि बोलायचं श्री स्वामी समर्थाय नमः पुन्हा एक चमचा पंचामृत घ्यायचे पुन्हा मूर्तीवर टाकायचं आणि पुन्हा श्री स्वामी समर्थाय नमः बोलायचे. 11 वेळेस टाकायचं 11 वेळेस स्वामींचा जप करायचे.

पंचामृत टाकून झाल्यानंतर 11 वेळेस तुम्हाला पाणी टाकायचा आहे. त्या वेळेस सुध्दा तसेच अकरा वेळा पाणी टाकलं तेव्हा एक एक वेळेस श्री स्वामी समर्थाय नमः तुम्हाला बोलायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर स्वामींची मूर्ती पुन्हा हातात घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे.

त्यानंतर स्वामींचे स्नान झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वामींच्या जागी देवघरात स्वामींना स्थापन करायचं आहे. त्यानंतर अष्टगंध, हीना अत्तर असेल तर हिना अत्तरतर लावून स्वामींचे पूजन करायचे, अगरबत्ती दिवा लावून स्वामींना ओवाळणी करायची, फुल हार असेल फुल हार लावायचा.

त्यानंतर स्वामींची आरती येत असेल तर आरती करायची. त्यानंतर काही नैवेद्य तुम्ही आणला असेल बाहेरून किंवा घरी काय केलं असेल शिरा वगैरे काहीच केलं नसेल तर दूध साखर दाखवली तरी चालते.

हे सगळं झाल्यानंतर स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे. अशा सोप्या रीतीने स्वामींचे अभिषेक तुम्ही नक्की करावे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *