नमस्कार मित्रांनो,
हिंदु धर्म आणि संस्कृती मध्ये नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिल पासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2079 सुरू होणार आहे. मग हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूपच खास असणार आहे. कारण त्यांची भरपूर प्रगती होणार आहे.
तसेच त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी धनलाभाचे योग सुद्धा जुळून येणार आहेत. पण कोणत्या आहेत त्या राशी चला तर मग जाणून घेऊया.
1) मिथुन रास – नव संवत्सर नववर्ष 2079 अनेक बाबतीत मिथुन राशीसाठी शुभ आहे. या वर्षी तुम्हाला शनीच्या ध्येयापासून मुक्ती मिळेल. अडीच वर्षात तुम्ही केलेल्या संघर्षाचे शुभ परिणाम तुम्हाला आता मिळू लागले.
त्याच बरोबर या वर्षी राहू तुमच्या बाराव्या स्थानापासून अकराव्या भावात संचार करेल यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यतही चांगले बदल बघायला मिळतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्नही या वर्षी पूर्ण होऊ शकते.
2) कन्या रास – कन्या राशि साठी हिंदू नववर्ष 2079 कसा असणार आहे ते आता बघूया. या वर्षी एकाग्रता तुमची खूप वाढणार आहे. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील. या वर्षी तुम्ही कुटुंबियांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. आर्थिक कामासंबंधित यश मिळेल.
या वर्षी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडूनही मदत मिळू शकते. घरापासून दूर काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी काही लोकं त्यांचं घर किंवा घरापासून दूर जमीन खरेदी करू शकतात. कन्या राशीच्या आरोग्यतही चांगले बदल दिसून येतील.
3) वृश्चिक रास – वृश्चिक राशीची लोकांना या वर्षी केतू तुमच्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तुम्ही ज्या मानसिक त्रासाला सामोरे जात होता त्यावर आता तुम्ही मात कराल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकते आणि व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल.
तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या नात्यातही सुधारणा झालेली दिसून येईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल झालेला दिसून येतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे शिक्षणात यश मिळेल. या राशीच्या महिला या वर्षी कुटुंबात संतुलन राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात.
4) धनु रास – धनु राशीच्या लोकांची निर्णय क्षमता या वर्षी चांगली असेल. ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा समन्वय सुधारेल. तुम्ही कुटुंबातील शुभकार्यात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनाची गाडीही रुळावर येईल.
मात्र सामाजिक स्तरावर या वर्षी तुमचं म्हणणं जपून ठेवावे लागेल अन्यथा बदनामी होऊ शकते. या राशीचे लोक या वर्षी योग आणि ध्याना त्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील. या वर्षी काही लोकं साहसी उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होतील.
5) मकर रास – या वर्षी शनीदेव तुमच्या राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील. राजकारणातील लोकांना यश मिळू शकेल. आरोग्याची समस्या दूर होतील.
या राशीचे विद्यार्थी ज्यांना पूर्वी एकाग्रतेचा अभाव जाणवत होता ते नवीन वर्षात एकाग्रतेने केंद्रीत दिसतील. मकर राशीच्या या वर्षी वडिलांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही काही आजाराने त्रस्त असाल तर नवीन वर्षात तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.