सावधान! दही खाल्ल्यानंतर किंवा दही सोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात जाऊन बनतात विष!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला दही खायला आवडते का आणि त्याबरोबर किंवा त्यानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर उत्तर हो असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकते. चला तर जाणून घेऊया दह्यासोबत किंवा दही खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करणं हानीकारक असतं.

दही भारतातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपैकी एक पदार्थ आहे. जेवणात फक्त दही किंवा ताकाचा वापर कल्याने अन्नाची चवच वाढत नाही तर त्याउलट हे आपल्या शरीराला दिवसभरातील अनेक पोषक तत्वांची पूर्ती करते. तसेच दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पाचन तंत्र सुधारण्यासाठी कार्य करतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दही हे एका हेल्दी बॅक्टेरियाच्या मदतीने तयार होते ज्याला लैक्टोबॅसिलस या नावाने ओळखले जाते. याव्यतिरिक्त दही आतड्यांच्या जीवाणूंसाठी देखील फायदेशीर असते.

पण जर तुम्ही इतर काही गोष्टीं सोबत दही खाल्ले तर ते तुमच्या पाचन तंत्रालाही हानी पोहोचवू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांची गोष्टींची यादी सांगणार आहोत जे पदार्थ तुम्ही दह्या सोबत किंवा दही खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नयेत नाहीतर आरोग्यास हानी पोहचू शकते.

आंबा : साधारणपणे लोकांना दही आणि आंब्याचे मिश्रण खायला प्रचंड आवडते. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आंबा आणि दही या दोन पदार्थांचे एकत्र सेवन किंवा दही खाल्ल्या नंतर आंबा खाल्ल्याने त्वचेची अँलर्जी होऊ शकते. खरं तर या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात विष निर्माण होते. ज्यामुळे त्वचेच्या अँलर्जीची समस्या निर्माण होते. त्यामुळे आंब्याच्या सिझनमध्ये भरपूर आंबे येतात व सर्रास लोकांकडून ही चूक घडते पण आता असं करणं नक्की टाळा.

दूध : भलेही दुधापासूनच दही तयार केले जात असेल पण तरीही या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगू की दही नासवलेल्या दुधाद्वारे बनवले जाते आणि त्या दोन्ही मध्ये प्रथिने आणि चरबी मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांचे एकत्र सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, अतिसार, ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

मासे : जर तुम्ही दह्या सोबत किंवा दही खाल्ल्यानंतर माशांचे सेवन करत असाल तर ते तुमच्यासाठी अत्यंत हानिकारक देखील ठरू शकते. आयुर्वेदानुसार दोन उच्च प्रथिनेयुक्त अन्न कधीही एकत्र खाऊ नये. अशा स्थितीत या दोघांची गणना उच्च प्रथिनेयुक्त सामग्रीमध्ये केली जाते. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने तुमची त्वचा ठिकठिकाणी सफेदही पडू शकते. याव्यतिरिक्त हे कॉम्बिनेशन पाचन तंत्राला देखील हानी पोहोचवते.

तेलकट तुपकट पदार्थ : जर तुम्ही दही खाल्ल्या नंतर लगेचच तेलकट तूपकट अन्नपदार्थ खात असाल जसे की तूप आणि पराठे, भजी आणि चीझ फ्राय इत्यादी, तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप नकारात्मक व वाईट परिणाम होतो. हे केवळ आपली पाचन प्रणाली खराब करत नाही. तर उलट यामुळे तुम्हाला सतत सुस्त, आळस आल्यासारखं आणि थकल्यासारखं वाटू शकतं.

दही इतकी हेल्दी का आहे? दही बनवण्याच्या प्रक्रियेत वापरले जाणारे लैक्टिक अॅसिड दहीला एक क्रीमी टेक्सचर देतं. दही हे प्रोबायोटिक घटकांनी समृद्ध असते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी -2, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे जीवनसत्त्व आणि खनिजे दह्यामध्ये आढळतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. परंतु दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्यांपेक्षा जास्त हानी देऊ शकते.

जसे की, त्वचेशी संबंधित समस्या आणि पचन संबंधित समस्या इत्यादी. एवढेच नाही तर आयुर्वेद काही गोष्टींसह दही खाण्यास मान्यताही देत नाही. म्हणूनच दही खाताना वरीलपैकी कोणताही पदार्थ मिक्स करून किंवा नंतर खाऊ नका. दह्याला कोणत्याही इतर पदार्थांची आवश्यकता नसते कारण ते स्वत: खूप पोषक घटकांनी समृद्ध आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *