आजचा रविवार ठरणार टर्निंग पॉईंट.. या 5 राशीचे चमकून जाणार भाग्य…

राशिभविष्य

नमस्कार मंडळी

मेष :-चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा भावना आणि व्यवहार अर्थात मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाची बाजू वरिष्ठांपुढे प्रभावीपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या कलात्मकतेला वाव मिळेल. मुलांवर केलेले संस्कार कामी येतील. त्यांच्यातील समाजकार्याची आवड दिसून येईल. श्वास लागणे, धाप लागणे असे त्रास आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत.

वृषभ:- चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग हा उत्साहवर्धक आहे. नव्या संकल्पनांना पूरक वातावरण मिळेल. सकारात्मक विचारांनी इतरांना धीर द्याल. गरजवंतांना दिशा दाखवाल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल. सहकारीवर्गाला सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक वातावरण शिस्तीचे पण प्रेमाचे राहील. मुलांसाठी केलेले आर्थिक नियोजन कामी येईल. उत्सर्जन संस्थेसबंधित त्रास, जळजळ होणे अशा समस्या उदभवतील. काळजी घ्यावी.

मिथुन:- बुध-नेपच्यूनचा नवपंचम योग हा बुद्धिमत्तेला अंत:स्फूर्तीची जोड देणारा योग आहे. नवनिर्मितीसाठी पूरक ग्रहमान आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात साकल्याने विचार करून योग्य निर्णय घ्याल. सहकारीवर्गाच्या समस्या समजून घ्याव्यात. जोडीदाराचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. मुलांच्या बाबतीत शुभ वार्ता समजतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. उष्णतेच्या विकारांवर वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत.

सिंह:- गुरू-मंगळाचा समसप्तम योग उदात्त विचारांना प्रत्यक्षात आणणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात मंगळाची ऊर्जा आणि गुरूचे ज्ञान यांचा उत्तम संगम दिसून येईल. सहकारीवर्गाला समाजकार्यासाठी उद्युक्त कराल. वडीलधाऱ्या आदरणीय व्यक्तींकडून मोलाचा सल्ला मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मुलांच्या कामाला गती मिळेल. लहान-मोठय़ा प्रवासात पडणे, मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी.

टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

डॅशिंग मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *