देवाकडे, स्वामी समर्थांकडे काय मागावे? अनुभव येईल !

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्यातील बरेचजण स्वामी समर्थांचे भक्त आहेत. मनोभावे ते पूजा करीत असतात परंतु बरेच जण हे आपल्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामी समर्थांची सेवा करीत असतात. तर मित्रांनो बऱ्याच स्वामी भक्ताना हा प्रश्न पडलेला असतो की, आपण स्वामींकडे काय मागावे? आपल्या भरपूर इच्छा आहेत. आम्हाला जे हव आहे ते आम्हाला कधीच मिळत नाही. मग देवाकडे स्वामी समर्थांकडे असं काय मागावं जे आम्हाला मिळेल.

असा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. तर मित्रांनो तुम्ही देवाकडे, स्वामी समर्थांकडे अशा काही गोष्टी मागू शकता ज्या स्वामी तुम्हाला देतील. या गोष्टी मागितल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. तर मित्रांनो बरेच जण आपल्या देवाकडे, स्वामी समर्थांकडे भरपूर पैशासाठी तसेच अनेक गाड्या तसेच बंगला यांची मागणी करीत असतात.

म्हणजेच या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ते प्रार्थना करत असतात. परंतु मित्रांनो स्वामी समर्थांकडे पैसा, बंगला, गाडी यापैकी काहीच मागू नये. तर तुम्ही स्वामी समर्थांकडून आपल्या परिवारामध्ये प्रेम राहावे ही गोष्ट तुम्ही मागू शकता. घरात राहणाऱ्या सदस्यांना एकमेकांबद्दल आदर असावा हे तुम्ही आपल्या स्वामी समर्थांकडे मागू शकता.

तसेच आहे त्या परिस्थितीमध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती समाधानी रहावी असे काहीतरी तुम्ही आपल्या स्वामी समर्थांकडे, देवाकडे मागू शकता. घरातील लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद राहू दे. हे तुम्ही मागू शकता. तसेच आपल्या घरातील कुटुंबीयांना, प्रत्येक सदस्याला कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा सामना करावा लागू नये अशी इच्छा तुम्ही आपल्या देवांकडे स्वामी समर्थांकडे करू शकता.

घरातील प्रत्येक सदस्य हा सुखी रहावा असे तुम्ही आपल्या स्वामी समर्थांकडे मागू शकता. तर मित्रांनो बंगला, गाडी, पैसा या गोष्टींपेक्षा देखील आपल्या कुटुंबीयांचे जीवन सुखी राहावे अशी इच्छा तुम्ही आपल्या देवाकडे स्वामी समर्थांकडे करू शकता. तर मित्रांनो आपल्या देवाकडे स्वामी समर्थांकडे पैसा, बंगला, गाडी कधीच मागू नये. तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान,आदर कुटुंबीयांचे जीवन हे सुखमय राहू दे अशी मागणी तुम्ही आपल्या देवाकडे करू शकता.

जर जीवनात सुख, शांती, समाधान,आदर असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाचीच कमतरता राहणार नाही. जीवनातील सुख, समाधान, शांती हेच आपले जीवन आहे. मग आपणाला पैसा, गाडी, बंगला घेऊन काय करायचे आहे.

तर मित्रांनो आपण आपल्या स्वामींकडे आपल्या देवाकडे आपल्या समाधानी ची इच्छा मागायची आहे. आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची मागणी तुम्ही आपल्या देवाकडे, स्वामी समर्थांकडे करायची आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या स्वामी समर्थांकडे, देवाकडे कोणते मागणे मागणार असाल तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हे मागा. यामुळे तुमचे जीवन सुखमय होईल. कशाचीच कमतरता तुम्हाला भासणार नाही. याचा अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच येईल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *