माहेरी आलेल्या मुलीला बुधवारी सासरी पाठवू नये

माहिती अध्यात्मिक

मित्रांनो नवीन लग्न झालेल्या मुलीने कधीही बुधवारी सासरी जायचे नाही कारण याचे खूप असे नुकसान सांगितले आहेत पूर्वीच्या काळापासून असे काही रितीदेखील चालत आलेल्या आहेत त्या आपल्याला पाळणे खूप गरजेचे आहे.

आपली आजी किंवा आपली पणजी असे खूप जण आपल्याला सांगत असतात की बुधवारी कधीही सासरी जाऊ नये याच्या पाठीमागे देखील काही कारणे असू शकतात आणि आज देखील आपण त्या सर्व गोष्टी पाळत असतो.

त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलीला बुधवारी कधीही सासरी लावून द्यायचं नाही लाडकी लेक घरी आली की घर एकदम आनंदून जात लग्नाला किती वर्षे होऊन गेली.

तरी माहेर ची ओढी नेहमी मुलीला सतावत असते सासरी कितीही प्रेम मिळालं तरी माहेरची आठवण थोडी का असेना मुलीला येतच असते . माहेरच्या व्यक्तीमध्ये चे प्रेम ओढ आकर्षण हे नेहमी मुलीच्या मनामध्ये राहतच.

माहेरच्या लोकांबदल एक चुकीचा शब्द देखील ती मुलगी सहन करू शकत नाही अशा मुलीचा सासरी जाताना नेहमी पाय जड होतो ती कितीही दिवस माहेरात थांबली तरी शेवटी तिला सासरी हे जावंच लागतं म्हणून पूर्वी पाठवणं करताना एक नियम पाळला जात होता.

तो म्हणजे बुधवारी लेकीला सासरी कधीही पाठवायचे नाही तर त्यामागे कोणते कारण आहे तर त्याचं कारण बुध प्रदोष या व्रतामध्ये सांगितलेल आहे तर ती कोणती कथा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

नवीन लग्न झालेला पुरुष आपल्या बायकोला घेण्यासाठी गेला होता पूर्वीचा काळ असल्यामुळे पतीने आपल्या पतीला व्यवस्थित पाहिलं देखील नव्हतं ते दोघं घरी जायला निघाले होते प्रवाशांमध्ये तेव्हा तिलाअचानक तहान लागली होती.

तेव्हा तिने मान खाली घालून पतीला पाणी आणायला सांगितले. बैलगाडीचा प्रवास होता बैलगाडी थांबवत पती पाणी आणायला खाली उतरला.थोड्यावेळाने तो पाणी घेऊन आला तर तो अचानक असं बघतो की आपली पत्नी परपुरूषाशी बोलत आहे.

म्हणजेच की अनोळख्या माणसासोबत ती बोलत आहे आणि त्या व्यक्तीने दिलेलं पाणी पीत असते त्याचा त्याला खूप राग आला होता तो तावातावाने रागाने जाऊन बायकोशी भांडू लागला आणि पाणी घेऊन आलेला हाच आपला नवरा आहे असं वाटून तीन ते पाणी पिले होते .

तिला तिची चूक लक्षात आली ती पतीची माफी मागत होती तरी देखील पतीला ते पटलं नव्हतं अशा वेळेला महादेवांची प्रार्थना केली व महादेवाच्या कृपेने तो पर पुरुष काहीही न बोलता निघून गेला आणि नवदांपत्याच भांडण तिथे मिटलं.

आणि महादेवांमुळे त्यांचा काडीमोड म्हणजेच की घटस्फोट होता होता वाचला म्हणून त्यांनी बुधप्रदुष व्रत हे चालू केलं होतं आणि बुधवारी सासरी निघायचं नाही असं संकल्प देखील केला होता .आताच्या काळामध्ये हे वाचन करताना आपल्याला थोडेफार वेगळं वाटतं.

देवभक्ती रुजवण्याचा नाती सांभाळण्याचा आणि प्रामाणिक राहून नैतिकता जपण्याचा संस्कार या कथेमधून आपल्याला दिसून येतो पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण देखील म्हटले जायची ती म्हण अशी आहे जाशील बुद्धी तर येशील कधी? बुद्ध कथेच्या व्रत म्हणून ही म्हण आली असेल असं देखील म्हटलं जातं .

जर बुधवारी घरातली मुलगी सासरी गेली तर ती लवकर परत येत नाही असं याचा समज होतो त्याच्यामुळे बुधवारी कधीही लेकिला सासरी पाठवत नाहीत व तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे.

पूर्वी माहेर आणि सासर दूर असल्यामुळे लेकीची आतुरतेने ते वाट बघत असायचे माहेर कितीही जवळ असलं तरी लेकीला तिथे सारखे सारखे जाता येत नाही कारण जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होतं तेव्हाच तिचे सासर हेच तिचं माहेर आहे असं देखील तिला सांगितलं जातं.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *