धनत्रयोदशी पूजेतील ही एक वस्तू ठेवा तिजोरीत ; वर्षभर पैसा कमी पडणार नाही !

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो, धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करीत असते. तर मित्रांनो धनत्रयोदशीची पूजा सर्वांच्या घरी अगदी मनोभावे व श्रद्धेने केली जाते. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करीत असतो.

तर मित्रांनो धनत्रयोदशी पूजेतील अशी एक वस्तू आहे जी आपल्या तिजोरीत जर तुम्ही ठेवली तर यामुळे तुम्हाला वर्षभर पैसा कमी पडणार नाही. ती वस्तू नेमकी कोणती आहे? याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो यावर्षी 23 ऑक्टोंबर रविवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे.

मित्रांनो धनत्रयोदशी दिवशी आपण धन्वंतरी, कुबेर आणि लक्ष्मी मातेची पूजा करीत असतो. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये पैसा येतो. कुबेरांच्या कृपेने तो पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहतो. तसेच धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य हे चांगले राहते.

ही पूजा करीत असताना मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड अंथरायचे आहे. त्यावरती माता लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देवीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे. गंध, अक्षता, फुले वाहून विधीवत पूजा करायचे आहे. लक्ष्मीला प्रिय असणारे लाल रंगाचे फुल आपणाला अर्पण करायचे आहे.

तसेच मित्रांनो तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच तुम्हाला गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे गायीचे तूप नसेल तर तुम्ही तीळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता.

मित्रांनो या धनत्रयोदशी दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये तुम्ही आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये असणाऱ्या धनेचा वापर करायचा आहे आणि हे धने दोन्ही आपल्याला धन्वंतरी, माता लक्ष्मी तसेच कुबेर यांना अर्पण करायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला मनोभावे पूजा करायचे आहे.

मित्रांनो धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पूजा विसर्जन करणार असाल त्यावेळेस तुम्हाला या पूजेतील एक वस्तू आपल्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे. जेणेकरून तुम्हाला पैशाच्या बाबतीत अडचण कधीच भासणार नाही आणि मित्रांनो ती वस्तू आहे अक्षता म्हणजेच तांदूळ.

मित्रांनो आपण पूजेमध्ये माता लक्ष्मी, कुबेर महाराज व धन्वंतरी यांना अर्पण केलेले तांदूळ आहे त्यातील तुम्हाला 11 दाणे तांदळाचे आपल्याला एका लाल कपड्यांमध्ये बांधून म्हणजे त्याची पुरचुंडी करून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता.

असे केल्याने मित्रांनो तुमचा जो काही घरातील पैसा आहे तो पैसा टिकून राहील म्हणजेच पैसा या ना त्या कारणाने खर्च होत असेल तर तो खर्च होणार नाही. पैशाच्या बाबतीत सर्व अडचणी दूर होतील. तसेच मित्रांनो तुमचा जर एखादा उद्योग व्यापार असेल तर तेथील गल्ल्यात देखील तुम्ही ही पुरचुंडी ठेवू शकता. जेणेकरून तुमच्या उद्योग व्यापारांमध्ये भरभराट येईल आणि तुम्हाला नफा मिळेल. एकूणच तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. असा हा प्रभावशाली व चमत्कारिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *