सकाळी आंघोळीनंतर बोला हा मंत्र दिवस शुभ जाईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज दैनंदिन जीवनातील महत्वाची कामे पार पाडण्यासाठी काही अशा उपाय सांगणार आहे मला आशा आहे की, हे उपाय वापरून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करू शकाल. एखाद्या दिवशी आपल्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतो, उदास वाटू लागतो, बोर होते आणि कामांमध्ये मन लागत नाही.

काम तर करावाच लागेल, कामाला पर्याय नाही. अशावेळी ओम चैतन्य गोरक्षनाथय नमः या मंत्राचा सकाळी आंघोळीनंतर फक्त 20 मिनिटे जप करा. चमत्कार घडून येतो जीवनातून उदासीनता निघून जाते, कामामध्ये मन रमू लागतो. ओम चैतन्य गोरक्षनाथय नमः मित्रांनो तुमचे महत्त्वाचं काम आहे त्या कामासाठी तुम्ही जर घराबाहेर पडत आहात तर त्या कामाचा कुठेही वाचता करू नका.

प्रत्येकाला येणाऱ्या भेटणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कामाविषयी सांगू नका. असं केल्याने कामात विघ्न येतात. निष्कारण कामाला फाटे फुटतात आणि काम अयशी होण्याची जास्त शक्यता असते आणि हो महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहे तर शक्यतो काहीतरी खाऊन मगच घराबाहेर पडावे.

जर काम खूप महत्त्वाचा आहे तर आपल्या घरातील श्रीयंत्र आपल्या खिशात आपण ठेवावे आणि घराबाहेर कामासाठी पडावे यामुळे कामात हमखास यश प्राप्त होते. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना ते काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्यावेत.

तडकाफडकी घेतलेले निर्णय शक्यतो चुकतात. किमान 24 तास एखादा निर्णय घेताना 24 तास त्यावर विचार आपण करायला पाहिजे. मित्रांनो अनेकदा आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा असते ती आपले निर्णय चुकीचे ठरवते. आपण रागाच्या भरात किंवा त्या नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेऊ लागतो.

अशा वेळी ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घरातून ती नामशेष करण्यासाठी दररोज फक्त गुरुवारचा दिवस सोडून रोज फरशी पुसताना त्यामध्ये थोडं समुद्री मीठ म्हणजे मोठे मीठ, खडे मीठ आपण म्हणतो हे मीठ त्यामध्ये टाकावे आणि त्या मीठ मिस्त्रीत पाण्याने आपण फरशी पुसावी. यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते क्षीण म्हणजे नाहीशी होते.

आपल्या वास्तूमध्ये जर एखादी फुटलेली काच असेल आरसा असेल, जी खिडक्यांची तावदान असता ती जर फुटलेले असतील, कपबशी जर फुटले असतील, आरसा, खिडक्या दरवाजे, कपाट यांच्या काचा जर फुटलेल्या असतील तर त्वरित त्या बदलून घ्याव्यात त्याठिकाणी नवीन काच लावावे.

कारण या फुटलेल्या काचा किंवा आरसा मोठा अपशकून मानण्यात आलेले आहेत. आपल्या घरामध्ये जे कोणी सदस्य आहेत तुमची ज्या देवावर भक्ती आहे त्या देवाचा मंत्र कमीत कमी 108 वेळा आपण दररोज म्हणावा किंवा लिहून काढावा. हा मंत्र बोल्याने जास्त फायदे होतात.

उदाहरणार्थ जर तुम्ही महादेवांचे भक्त आहात तर ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप म्हणजे एक माळ जप करावा. जर भगवान श्रीहरी विष्णूंवरती तुमची श्रद्धा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि जर आपण श्री दत्तगुरु भक्त आहात तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त यासारख्या मंत्रांचा जप करा.

या मंत्रांचा जप केल्याने घरातून दारिद्र्यता, गरिबी, नकारात्मक ऊर्जा या गोष्टी खूप लवकर निघून जातात. आपल्या घराच्या गृहिणी आहेत त्यांना हे सांगायला विसरू नका की, घरातील आपल्या स्वयंपाकघरात बनलेली पहिली भाकरी, पहिली चपाती ही गायीसाठी काढून ठेवा.

दुसरी चपाती भाकरी ही कुत्र्यासाठी आणि तिसरी चपाती पक्षांसाठी म्हणजे कावळे, चिमण्या यांच्यासाठी काढून ठेवा. जे पितृदोष असतात, ज्या पितृदोषांचा त्रास या सवयीमुळे काही प्रमाणात कमी होतो. मित्रांनो यापुढेही आपणासमोर अशाप्रकारे असे उपाय येऊन येणार आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *