मित्रांनो आपण खूप सारे कष्ट करून देखील आपल्या जवळ पैसा टिकत नसेल. आपण जास्त मेहनत करून देखील आपल्याला यश देखील प्राप्त होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये बरकत नसेल म्हणजेच की एखादी गोष्ट सारखी सारखी संपत असेल विनाकारण खर्च होत असेल आपण जास्त कमवून देखील आपल्या हातामध्ये जर पैसा टिकत नसेल.
म्हणून आपल्या घरामध्ये गरिबी पसरत असेल तर ती गरिबी पसरण्याची नेमकी कोणती कारणे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो गरुड पुराणांमध्ये असं सांगितलं गेलेल आहे की व्यक्तीचं घर हे चांगल असावं व त्याने चांगले चांगले कर्म देखील करायचे आहे इतरांचे वाईट कधीही चिंतायचे नाही इतरां बद्दल नेहमी आदर ठेवावा व त्यांच्याशी नेहमी प्रेमानेच वागावे.
मित्रांनो घरात गरिबी पसरण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे पती-पत्नी मधील वाद पती-पत्नीचे वादामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती तर येते त्याचबरोबर घराचे पूर्ण वातावरण देखील बदलून जाते नवरा बायको हे खूप महत्त्वाचे असतात नवरा-बायको चांगले असले तरच कुटुंब देखील चांगले होते.
ज्या घरामध्ये पती-पत्नींमध्ये वारंवार कलह भांडण तंटे कारण नसताना देखील भांडण होत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या वादामुळे गरीबी त्या ठिकाणी येते आणि जितके काळ त्यांच्यामध्ये वाद होत राहतील तितके घरात गरिबी पसरत राहणार आहे.
घरातील स्त्रीला लक्ष्मीचे रोप व अन्नपूर्णेचे रूप मानले गेले आहे घरामध्ये जर स्त्री असेल तर घरातील वातावरण एकदम प्रफुल्लित होऊन जातो कारण स्त्री शिवाय घर अपूर्ण आहे असं मानलं गेलेलं आहे. ज्या घरामध्ये वारंवार कलह भांडणे होत राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही कधीही राहत नाही.
दुसर कारण आहे ते म्हणजे घरामध्ये गरीबी येण्याचे आपल्या घराचे मुख्य द्वार आस्वच्छ ठेवल्याने घरामध्ये गरिबी पसरते आपले मुख्य द्वार हे नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे घराचा मुख्य दरवाजा आस्वच्छ ठेवणे हे देखील गरिबपणाच लक्षण आहे.आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार जर लक्ष्मी आले नाही.
तर आपल्या घरामध्ये कायमच गरिबी राहणार आहे घराचा मुख्य दरवाजा हा घराचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये जर लक्ष्मीचा वास हवा असेल तर आपले घर तर नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजा व समोरची पूर्ण जागा स्वच्छ ठेवायची आहे. याची काळजी घेतली पाहिजे.
मुख्य दरवाजाला आपल्याला जेवढे सुशोभीत करता येईल तेवढ आपल्याला करायचा आहे.रोज संध्याकाळी मुख्य दरवाजा जवळ दिवा लावायला कधी विसरायचा नाही. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये उष्टी भांडी ठेवणे आपण स्वयंपाक बनवून झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर भांडी तशीच एकत्र करून बेसिनमध्ये ठेवत असतो.
ते देखील दरिद्र पणाच लक्षण मानलं गेलेलं आहे ही उष्टी भांडी पूर्ण रात्रभर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असते. आणि त्याचबरोबर गरिबीला आपण स्वतः आमंत्रण देत असतो असे देखील म्हटले जाते कीतीही कंटाळा आला किंवा कितीही काही अडचणी आल्या तर रात्रीची भांडी कधीही तसेच ठेवायचे नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.