पोट 2 मिनिटात साफ, सकाळी पोट धुतल्यासारखे स्वच्छ होईल, बद्धकोष्टता, अपचन, गॅसेस पूर्णपणे कमी

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

सध्याची जीवनशैली इतकी फास्ट झाली आहे की, आपण सगळ्या गोष्टी फटाफट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या फटाफट काम करण्यामध्ये आपण आपल्या पचनक्रियेकडे नीट लक्ष देत नाही आणि त्याचा आपल्या पचनशक्तीवर खूप वाईट परिणाम होत असतो.

या घाई गडबडीच्या जीवनामध्ये आपलं पचन बिघडत पण ते आपल्याला कळत नाही. त्याची काही लक्षणे असतात आणि काही लक्षणे नसतात. मग आपण काही लक्षण आहेत त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण काय तर त्याचा आपल्याला कुठलाही त्रास नसतो.

जेव्हा त्रास व्हायला लागतो तेव्हाच आपण त्याचा विचार करतो आणि मग शोधाशोध करतो किंवा त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन झाले आहे हे आपल्याला कळायला खूप वेळ लागते.

बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा जो आजार आहे तो आपल्या पचनाशी निगडित असून याची लक्षणे जर तुम्ही नीट लक्ष दिले तर सहज ओळखू शकता. जसे की, आठवड्यामधून फक्त तीन ते चार वेळेस शौचास लागणे, कडक स्वरूपाचा मल होणे, शौचास करताना खूप जोर लागत असेल, पोट व्यवस्थित किंवा नीट साफ होत नसेल,

पोट दुखणे, पोट जड पडणे, भूक कमी लागणे अशी जर समस्या तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच तुम्हाला अपचन किंवा बद्धकोष्ठता हा आजार झालेला असू शकतो आणि हा आजार वेळीच तुम्ही जर कंट्रोलमध्ये आणला नाही तर तुम्हाला मूळव्याध, फिशर, रक्तीमुळ्याध होण्याचे प्रमाण जास्त असतात.

त्याचप्रमाणे गॅसेस होते, डोकेदुखी, चिडचिडेपणा, तोंडाचा वास येणे, स्थूलपणा, पोट दुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. अपचन होण्याची अनेक कारणे असतात आणि ही बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आज आपण अगदी सोपा घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला किचनमधील दोन ते तीन वस्तू लागणार आहेत.

पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे जायफळ. प्रत्येकाच्या घरी जायफळ हे असतातच. पुरणाची पोळी बनवताना त्यात हरभऱ्याची डाळ वापरतात आणि हरभऱ्याची डाळ पचायला जड असते आणि लवकर पचत नाही. म्हणून पुरणाच्या पोळ्या बनवताना त्यामध्ये जायफळपूड घालतात.

जायफळाला इंग्रजीमध्ये नटमेग असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव मीरिस्तिका फ्राग्रंस असे आहे. हे किराणा दुकानात सहज मिळतात. जायफळ हे आयुर्वेदात खूप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे हे जायफळ आज आपण वापरायला घ्यायचे आहे. जायफळ आपल्याला खिसणीच्या साहयाने बारीक पूड बनवून घ्यायचे आहे.

या जायफळामध्ये अँटीऑक्सीडंट, विटामिन्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुण, फायबर आणि मिनरल्सदेखील हे घटक असतात. जे जठराणी प्रतिबिंबित करून चयापचयाला वेग देतात आणि चयापचयाचा वेग वाढला की, परिणामी पचन चांगलं होतं आणि जे आपण अन्न पदार्थ खात होतो ते पूर्णपणे पचायला मदत होते.

अशा या जायफळाचा किस एक वेळेच्या वापरासाठी यासाठी साधारणतः एक चमचा घ्यायचे आहे. हा वजनाला हलका असतो साधारणतः 500 मिली ग्रॅम ते 1 ग्राम एक वेळेच्या वापरासाठी या आपल्याला घ्यायचा आहे. आपणास दुसरा पदार्थ टाकायचा आहे ती म्हणजे सैंधव मीठ, सेंधा नमक किंवा रॉक सॉल्ट अशी नावे आहेत.

हे मीठ पोट साफ करण्यासाठी मदत करत आणि दिसायला सामान्य मिठासारखे असते पण थोडे लालसर रंगाचे असते. हे पहाडी मीठ म्हणून ओळखलं जातं. हे मीठ फक्त आपल्याला चिमूटभर किंवा पाव चमचा या मिश्रणात टाकायचे आहे आणि शेवटचा घटक लागणार आहेत ते म्हणजे लिंबू. या मिश्रणाचे पेस्ट बनेल इतकं लिंबू रस या मिश्रणामध्ये टाकायचे आहे.

लिंबू पोट साफ करण्यासाठी फार जुन्या काळापासून वापरण्याची परंपरा चालत आली आहे. म्हणून जेवणानंतर पाण्यामध्ये लिंबू पिळून पिण्याचे पद्धती फार जुन्या काळापासून प्रचिलित आहे. ज्यांना लिंबू जमत नसेल त्यांनी यामध्ये एक चमचा मध टाकुन ही पेस्ट तयार केली तरी चालेल. आता हे मिश्रण संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर घ्यावी व त्यावर कोमट पाणी घ्यावे.

हा जो उपाय आहे त्याचा परिणाम आपल्या पहिल्या दिवसापासूनच दिसेल. तरी हा उपाय सात दिवस सलग करायचा आहे. त्यानंतर फक्त जेव्हा तुमचे पोट साफ होणार नाही तेव्हाच करावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट हा उपाय गर्भवती मातांना वर्ज आहेत त्यांनी हा उपाय करू नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *