माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हा’ सोपा पण अत्यंत महत्त्वाचा एक उपाय : धनधान्याची लयलूट होईल !

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. की धनाची देवी सुखाची देवी समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक शंखाचा उपाय करायचा आहे. या शंखच्या उपायाने लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. हा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो .घरातील स्त्री पुरुष विद्यार्थी वर्ग कुणीही हा उपाय करू शकता.

हा उपाय केल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होते देवांना आवडणारी वस्तू म्हणजे शंकर सगळ्याच देवांना शंख खूप आवडतो.विष्णू देवांना श्रीकृष्णांना शंख खूप आवडतो आणि त्यांच्या हातामध्ये देखील शंख असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील शंख आवडतो. ब्रह्मदेवांना देखील शंख आवडतो. सर्व देवी देवतांना शंख खूप आवडतो असे मानले जाते की शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे.

या शंखाचा जर वापर आपण आपल्या देवघरामध्ये केला तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते. आणि एकदा का लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला की आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. घरामध्ये सुख समाधान बरकत भरपूर धनधान्य संपत्ती येते. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला शंख लागणार आहे.

आपल्या घरामध्ये शंखा असेल तर ठीक जर शंखा नसेल तर नवीन शंख घेऊन यायचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शंख आणायचा आहे. तो शंख मात्रा पांढराशुभ्र रंगाचा आणायचा आहे. शंख आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा इतर कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये सहज मिळतो. पांढराशुभ्र शंख घरामध्ये आणायचा आहे.

शंख घरामध्ये आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर तो शंख आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी स्थापन करायचा आहे. देवघरामध्ये शंख ठेवण्यासाठी जागा निश्चित करावी. आणि दररोज त्याच ठिकाणी शंख त्या ठिकाणी स्थापन करावे. आणि दररोज त्या शंखाची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. आपण जो उपाय करणार आहोत तो शंखाची उपाय करणार आहोत.

दररोज शंखाची पूजा तर आपल्याला करायचीच आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या वारी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे त्या शंखामध्ये पाणी किंवा दूध घ्यायचे आहे. ज्यांना दूध घेणे शक्य नाही त्यांनी त्या शंखामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ज्यांना दूध घेणे शक्य आहे, त्यांनी दूध घ्यायचे आहे. आणि त्या शंखातील दुधाने किंवा पाण्याने लक्ष्मी मातेला अभिषेक शुक्रवारच्या दिवशी घालायचा आहे.

शंखामध्ये दूध किंवा पाणी घ्यायचे आहे. आणि त्या टोकाकडील बाजूने त्या शंखातील पाणी किंवा दूध माता लक्ष्मीच्या अंगावर घालायचे आहे. म्हणजेच माता लक्ष्मीला अशा पद्धतीने अभिषेक होईल. माता लक्ष्मीला अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा माता लक्ष्मीची मूर्ती आहे. त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि तो शंख देखील आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे.

आणि दररोज न चुकता माता लक्ष्मीची आणि त्या शंखाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर दर शुक्रवारी सुद्धा माता लक्ष्मीला त्या शंखाने अभिषेक करणे खूप गरजेचे आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आणि आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी बरकत त्याचबरोबर धनसंपत्ती येईल. लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे कोणत्याही कामांमध्ये अडचणी येणार नाहीत सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *