कर्जमुक्तीसाठी ‘हा’ एक उपाय : तुम्ही कधी कर्जबाजारी होणार नाही, कर्ज घेण्याची वेळ येणार नाही !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो कर्जमुक्ती साठी करा हा एक उपाय हा उपाय केल्याने आपल्याला कर्ज कधीही घ्यावे लागणार नाही. आणि आपण कर्जबाजारी देखील होणार नाही. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज हे घ्यावे लागते. मग ते कर्ज शिक्षणासाठी असू द्या लग्नासाठी असू द्या घर घेण्यासाठी असू द्या.

गाडी घेण्यासाठी असू द्या अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज घ्यावे लागते. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक कारणासाठी किंवा आजारासाठी आपल्याला कर्ज हे घ्यावेच लागते. कोणतीही व्यक्ती आपल्या वाईट काळामध्येच कर्ज घेते. आणि हे कर्ज घेतल्यानंतर त्या व्यक्तीवर खूप कठीण परिस्थिती येते. आणि त्या कर्जाच्या ओजाखाली तो पूर्णपणे खचून जातो.

त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होतात आणि या सर्वांचा परिणाम त्या व्यक्तीला व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना सहन करावा लागतो. आपल्याला तर माहीतच आहे. कर्ज घेतलेला माणूस कष्ट करून कमवतो कमी आणि कर्ज फेडतो. जास्त आणि अशी वाईट परिस्थिती त्याची निर्माण होते. तुमच्यावर देखील कर्जा असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ आली असेल तर तुम्ही देखील या लेखांमध्ये सांगितलेला उपाय करा.

हा उपाय केल्याने आपण लवकर कर्जमुक्त होऊ आणि आपल्यावर कर्ज घेण्याची कधीही वेळ येणार नाही. हा उपाय कर्ज घेतलेल्यांनी व कर्ज न घेतलेल्याने देखील करायचा आहे. कर्ज घेतलेल्यांचे कर्ज लवकर फिटेल आणि त्यांच्यावर कर्ज घेण्याची कधीही वेळ येणार नाही. आणि ज्यांच्यावर कर्ज नाही. त्यांच्या आयुष्य असे समाधानात सुखात जाईल. व त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये देखील त्यांना कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.

जो आपण उपाय करणार आहोत. हा उपाय खूप चमत्कारी आणि शक्तिशाली उपाय आहे. आपल्याला हा उपाय बुधवारच्या दिवशी करायचा आहे. बुधवारचा वार हा श्री गणेशाचा वार आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे आपल्याला हा उपाय बुधवारच्या दिवशी करायचा आहे. बुधवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करत असताना आपल्याला श्री गणेशाचे गणेश स्तोत्र वाचायचे आहे. गणेश स्तोत्र आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये भेटेल गणेश स्तोत्र वाचून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे. व घरामध्ये बरकत समाधान समृद्धी येण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. श्री गणेश स्तोत्राचे वाचन आपल्याला दर बुधवारी करायचे आहे.

गणेश स्तोत्र वाचून झाल्यानंतर आणखीन एक आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसुरीची डाळ लागणार आहे. आपण मसुरीची डाळ आणायची आहे. आणि दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर त्यातील एक चिमूटभर डाळ घेऊन आपल्या घराच्या छतावर टाकायचे आहे. किंवा आपल्या घरा जवळ आजूबाजूला एखाद्या झाड असल्यास त्या झाडाजवळ ठेवायचे आहे.

असे मानले जाते, की मसुरीच्या डाळीचे ज्या व्यक्ती दान करतात. त्या व्यक्तींवर कधीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही. दररोज आपल्याला मसुरीची दान करणे शक्य नाही. म्हणूनच त्यातील थोडीशी चिमूटभर डाळ पक्षांसाठी आपण ठेवू शकतो. पक्षांसाठी देखील मसुरीची डाळ ठेवणे हे देखील खूप मोठे दान आहे. त्यामुळे दररोज न चुकता एक चिमूटभर डाळ पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावी.

दर बुधवारी गणेश स्तोत्र वाचायचा आहे. आणि दररोज न चुकता एक चिमूटभर डाळ पक्षांसाठी आपल्या घराच्या छतावर किंवा कोणत्याही झाडाखाली ठेवावी. हा उपाय केल्याने आपल्यावर कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. आणि आपल्यावर जे काही कर्ज झालेले आहे. ते कर्ज लवकर फेडले जाईल. नवीन कर्ज घेण्याची वेळ सुद्धा आपल्यावर येणार नाही.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *