कर्क राशीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो नक्की पहा.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो,

आता आपण कर्क राशीचे माणसं कशी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आवड असते हे पाहणार आहोत. तर मित्रांनो आता आपण कर्क राशीविषयी माहिती घेणार आहोत. कर्क राशीचे लोक हे शांत स्वभावाची असतील. कारण कर्क राशीचा राशीस्वामी हा चंद्र आहे. या राशीची लोकं हे रंगाने काळसर असतील.

त्याच पद्धतीने त्याचं डोक हे लहान असेल. आणि कर्क राशीच्या लोकांना उंचावरून खाली पडण्याची भीती ही अत्यंत असते. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी उंच भागावरती गेल्यानंतर जरा सावधानीने आणि त्या ठिकाणी वागावं. कारण उंचावरुन पडण्याची भीती असते. कर्क राशीचे माणसं ही अतिशय बेफिकीर असतात.

बरं कुठल्या गोष्टीची चिंता करत नाहीत. जबाबदारीने कुठल्या गोष्टी करत नाहीत आणि कर्क राशीचे माणसं ही निस्पृह असतात. त्यांच्या मनामध्ये कुठली गोष्ट नसते. कर्क राशीच्या लोकांना संतती पुष्कळ आणि ही संतती बरेच दिवसापर्यंत जगेल अशी असते. कर्क राशीच्या लोकांना देखील पोटाचा किंवा मानेचा विकार असतो.

म्हणून या राशीच्या लोकांनी आपल्या पोटाकडे लक्ष द्यावं. पोटातील काही विकार होत झाले असतील, होणारे असतील तर त्या विकाराकडे लक्ष द्याव. मानेचा काही विकार असेल तर त्या विकाराकडे लक्ष द्याव आणि या कर्क राशीच्या लोकांना आपल्या धर्मपत्नीकडून अत्यंत सुख मिळणार असत. पण कर्क राशीच्या लोकांना परस्त्रीपासून नेहमी दुःख आणि दुःखच मिळणार.

कर्क राशीच्या लोकांना पोट, पाय आणि नाभीच्या विकाराने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने कर्क राशीच्या लोकांनी पाण्यापासून नेहमी सावध असावं. कारण पाण्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे. कर्क राशीची लोकं हे वातप्रकृतीचे असतील आणि कर्क राशीच्या लोकांना वयाच्या पहिल्या वर्षी, सोळाव्या वर्षी आणि तिसाव्या वर्षी नेहमी गंडांतर येण्याची शक्यता आहे.

या सांगितलेल्या वयोमर्यादामध्ये या राशीचे लोक जर वाचले तर ते पुढे 78 वर्षापर्यंत जगतील. कर्क राशीच्या लोकांना पौष महिना हा अत्यंत त्रासदायक राहील. पौष महिन्यामध्ये मनस्ताप होणे, पौष महिन्यामध्ये त्रास होणे, पर लोकांनापासून त्रास होणे स्वलोकांपासून त्रास होणे पौष महिन्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. पौष महिना म्हणजे जानेवारी महिना.

कर्क राशीच्या लोकांनी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या नक्षत्रावरती कुठलेही महत्त्वाचं काम करू नये. त्याच पद्धतीने कर्क राशीच्या लोकांनी जर भगवान विष्णूंची आराधना जर केली तर पुढे आयुष्यामध्ये त्यांना अत्यंत मोठा लाभ होऊ शकतो. म्हणून या राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा जेणेकरून या मंत्राच्या साहाय्याने त्यांना जी इच्छा असेल त्यांची ती इच्छा पूर्ण होईल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *