एक मोहरीचा दिवा तुमचे घराचे स्वप्न करेल पूर्ण

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, आपले स्वतःचे एक घर असावे यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात. परंतु काहींचे हे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे होत नाही. आता हे स्वप्न पूर्ण न होण्यामागे अनेक कारणे असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात आणि त्यामुळे तुमचं घर होण्यामध्ये विलंब लागतो.

म्हणूनच आज आपण एका साध्या सोप्या उपाया बद्दल बोलणार आहोत. ज्यामुळे तुमचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. प्रत्येक व्यक्तीला वाटते की, त्याच्या स्वतःच्या मालकीचे एक छोटेसे का होईना घर असावे आणि त्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न सुद्धा करत असते आपण घर बांधण्याचे स्वप्न पाहतो.

मात्र त्यामध्ये अनेक समस्या सुद्धा येतात सर्वात मोठी समस्या असते. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. तर काही कुटुंबांमध्ये वाद चालू असतात आणि त्यामुळे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे आपले घर होण्यामध्ये अडथळे येत राहतात.

या समस्यांवर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. आपण कोणत्याही रविवारी आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या लाल रंगाच्या गाईला गुळ खाऊ घालावा. तुमच्या भागामध्ये लाल रंगाची गाय नसेल तर आपण कोणत्याही गायीला गूळ खायला घालावा.

त्यानंतर आपण गोमातेचे प्रार्थना करावी की, हे गोमाते आम्ही घर बांधण्याचा शुभारंभ करत आहोत आमचं स्वप्न पूर्ण होऊ दे. मित्रांनो आपले घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्या मंगळ असणे आवश्यक आहे. तुमच्या कुंडलीत जर मंगळ ग्रह दुर्बळ असेल तर घर बांधण्यामध्ये अनेक समस्या येत असतात. म्हणूनच मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंना फार महत्त्व आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावा बहिणींचे जर पटत नसेल आणि स्वतःचे घर होण्यामध्ये जर ही मोठी समस्या असेल तर त्यासाठी आपल्या भावा-बहिणींना एखादी लाल रंगाची मिठाई खाऊ घालावी. ज्याने काही दिवसातच आपल्या बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होते. घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण एखाद्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये मसूर डाळ बांधून ती दान करायची आहे.

हिंदू धर्मामध्ये दानधर्म केल्याने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. तर आपलं आपले घर बांधण्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. हे दान कोणत्याही मंदिरात करू शकतात किंवा एखाद्या गरिबाला सुद्धा देऊ शकतात.

तसेच सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण नित्यनियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण हा दिवा लावताना मातीच्या दिव्यांमध्ये लावायचा आहे. ज्यामध्ये मोहरीचं तेल टाकून हा दिवा लावायचा आहे. आपण देव पूजा करतो अगदी त्याच वेळी हा दिवा आपण प्रज्वलित करू शकतात.

देवाकडे आपल्या घरासाठी प्रार्थना करू शकतात. दिव्यातील तेल संपून जाईल त्यावेळी त्यात कापडाची एक वडी टाकायची आहे आणि अर्थात या उपायांबरोबरच तुमचे प्रयत्न मात्र सोडायचे नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *