हे 7 संकेत सांगतात की, ईश्वर आपल्यावर नाराज आहे.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो बदलाव हा प्रकृतीचा नियम आहे आणि आपल्या जीवनात सतत बदल होणे हे स्वाभाविक आहे. असं म्हणतात ओन्ली चेंज इज कॉन्स्टंट. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आणि दुःख दोन्ही निश्चित कालावधी पर्यंत आपल्या जीवनात राहतात आणि निघूनही जातात.

सुखाचे स्थान दुःख तर दुःखाचे स्थान सुख घेते आणि हे चक्र सतत सुरूच राहते. या चक्राला आपण भाग्य, नियती, किस्मत अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. हीच जीवनाची रीत आहे. परंतु हे आपले भाग्य कोण बनवते? हे सृष्टीचे पालनहार स्वतः देवच करत असतात.

तसेच आपल्या भाग्याची डोर देखील त्यांच्याच हातात असते. मित्रानो अनेक लोकांना सर्वसाधारण लोकांपेक्षा जास्त दुःख सहन करावं लागत. कधीकधी आपल्या पैकी देखील अनेक जणांच्या मनात असा प्रश्न पडत असेल की, हे फक्त माझ्याच बाबतीत का? माझ्याच वाट्याला एवढे दुःख आणि कष्ट असे का यावेत? देवांचे इतरांप्रमाणे माझ्यावर प्रेम नाही का?

परंतु मित्रांनो वेळे सोबतच ती व्यक्ती एक गोष्ट समजून जाते की कष्टा सोबत अनेक त्रास देखील सहन करावे लागतील. या त्रासासोबतच ईश्वराने त्या व्यक्तीला अत्यंत खास असे काही दिले असते. ज्यामुळे तो समजून जातो की ईश्वर त्याच्यावर अत्यंत प्रेम करतात. देव फक्त तुमची परीक्षा बघत असतो आणि तुम्हाला परखत असतो.

तुम्हाला देव जीवनातील अत्यंत कठीणातील कठीण अशा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार करत असतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कळते ईश्‍वर तुमच्यावर नाराज आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते संकेत?

पहिला संकेत – तुम्ही कोणतेही काम हाती घेता आणि त्यात तुम्हाला सलग अपयश प्राप्त होते. त्यामध्ये अगदी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी देखील तुम्हाला सफलता प्राप्त होत नाही. मित्रानो अशा प्रसंगी व्यक्तीला आपले धैर्य गमावले नाही पाहिजे आणि अशावेळी हे ध्यानात ठेवले पाहिजे की ईश्वराला चांगल्याप्रकारे माहित आहे, तुम्ही हे काम अजून चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात उत्तम करू शकता. त्यामुळे त्या लेव्हल वर पोहोचे पर्यंत ईश्वर तुम्हाला असफलताच देईल, जोवर तुम्ही तुमचे काम अत्यंत असरदार आणि चांगल्या पद्धतीने करत नाही.

दुसरा संकेत – तुम्हाला सलग मिळणाऱ्या असफलते मुळे तुमचे चांगल्यातील चांगले जवळचे लोक देखील तुमची साथ सोडतील. तुमचे अगदी जवळचे मित्र किंवा नातेवाईक देखील यामध्ये येतात. असंही होऊ शकतं की काही लोक तुमची मदत करू इच्छितात परंतु करू शकणार नाहीत. तेव्हा तुम्हाला ईश्वराने सुद्धा आपला हात सोडला आहे असे वाटेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला एकटे समजाल. परंतु या ठिकाणी तुम्हाला हे समजले पाहिजे की हे ईश्वर तुम्हाला एकटे पाडून तुम्हाला तुमच्या चुकांची समीक्षा करण्याची संधी देत आहे. झालेल्या चुकांची समीक्षा करून त्या सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे असे ईश्वराला अपेक्षित असते. एकटे राहून तुम्ही तुमच्याशी कनेक्ट व्हाल. स्वतःशीच प्रश्न उत्तरे विचाराल. आत्मपरीक्षण कराल. यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

तिसरा संकेत – ईश्वर तुम्हाला अपरिमित दुःख आणि कष्ट हालअपेष्टा देईल ज्यामुळे तुमचे जीवन अत्यंत दुखी कष्टी होऊन जाईल. अनेक लोक तुमचा विरोध करतील किंवा निंदा करतील. तुम्ही आतून तुटून जाल. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक चांगल्या व्यक्तीची सुरुवातीला निंदा आणि विरोधच झाला आहे.
आजवर जितक्या महान लोकांच्या गोष्टी ऐकल्या अथवा वाचल्या असतील त्यांना प्रारंभिक जीवनामध्ये विरोधाचा सामना करावाच लागला होता. लोक तुम्हाला हसतील, हीनवतील अथवा कमी लेखतील परंतु देवावर विश्वास ठेवून आपले कार्य करत रहा.

चौथा संकेत – जेव्हा अशा अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या समोर येतील त्या वेळेस तुम्ही स्थिर होऊन अशा समस्यांचा दोषाचे खापर इतरांवर न फोडता स्वतःच आपल्या अंतर्मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न कराल. हळूहळू तुम्ही शांतीचा अनुभव कराल. तुमचे विचार सकारात्मकतेच्या दृष्टीने चालू लागतील. तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक बदल अनुभवाल. यामुळे तुम्हाला गोष्टी समजून ईश्वराची प्रत्येक गोष्ट व योजना समजू लागेल.

पाचवा संकेत – तुमच्या मध्ये सकारात्मकता आल्याने तुम्ही दुनियेला आणि दुनियेतील लोकांना व्यवस्थित समजू शकाल. तुमच्यासाठी काय आवश्यक आणि काय अनावश्‍यक या गोष्टीदेखील तुम्हाला व्यवस्थित डोळसपणे समजू लागतील. तुम्हाला लोकांच्या टोमणे मारण्याने आणि हसण्याने कोणताही फरक पडणार नाही. महत्त्व नसलेल्या गोष्टींना तुम्ही महत्त्व न देता आत्मविश्वासाने पुढे जाल.

सहावा संकेत – ईश्वराद्वारे घेतल्या जाणाऱ्या कठिण परीक्षांमध्ये सफल होऊन तुम्ही त्या जागेवर पोहोचता ज्याची तुम्ही कामना केली होती. आणि याच गोष्टीसाठी तुम्हाला अपार कष्ट सहन करावे लागले होते. परंतु तुमच्या वास्तविक आणि सगळ्यात मोठी परीक्षेची वेळ हीच असते. मोठे परीक्षा असते ती तुमच्या समजदारीची. नेहमी समस्यांना तोंड देता देता सफलता प्राप्त करणारा व्यक्ती एक तर अहंकारी होतो किंवा बेपरवाह होतो. आपण सफलता मिळण्याच्या धुंदीत ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही.

सातवा संकेत – मित्रांनो ज्या व्यक्तीने या गोष्टी समजल्या त्यांनी ईश्वराला प्राप्त केले आहे. ईश्वराचा साक्षात्कार केला आहे. ईश्वर सुद्धा त्याच व्यक्तीची साथ देतो. त्याची साथ कधीच न सोडता प्रत्येक वेळी व्यक्तीदेखील ईश्वराचे अस्तित्व , चमत्कार मान्य करतो. त्या व्यक्तीला नेहमी ईश्वरांना आपल्या जवळच असल्याचे जाणवते.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *