धन कोणाजवळ थांबते, नक्की पहा.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

बहुतेक व्यक्तींची अशी समस्या आहे की, त्यांच्याकडे पैसा टिकतच नाही. कितीही पैसा घरात आला तरीही महिनाअखेर हातात काहीही शिल्लक राहत नाही. जणूकाही पैसा घरात येण्याअगोदरच पैसा जाण्याचे मार्ग ठरलेले असतात.

आपल्याला नेहमी वाटते की, आपल्याकडे भरपूर धन असावे. पैशाने आपले पर्स, पाकीट नेहमी भरलेले असावे. परंतु असे काही होत नाही. भरपूर पैसा येऊनही शेवटी अडचणीचे दिवस काढावे लागतात. अशावेळी आपल्याला काय करावे ते सुचत नाही. बहुतेक व्यक्तींचे म्हणणे असते की, पैसा टिकत नाही.

जर आपली महिन्याची कमाई 10 हजार रुपये आहे आणि आपण ते आणून तसेच ठेवले तर ते तसेच राहते. परंतु घरात डाळधाना इतर सामान, बाकीची खरेदी आपण कशातून करणार?
म्हणून जेवढे पैसे आले तेवढे तसेच ठेवले तर शक्यच नाही ते खर्च तर करावेच लागणार.

लक्ष्मी चंचल आहे ती जास्त काळ एका ठिकाणी थांबून राहत नाही. परंतु जर आपल्याला लक्ष्मीला थांबवायचे असेल धनाचा सदुपयोग करायचा असेल तर आपल्या उत्पन्नातील 10 टक्के भाग हा भगवंतांच्या कार्यासाठी गरिबांसाठी, गरजूंसाठी वापरावा. तेव्हा आपल्या उत्पन्नातील 90 टक्के भाग आपल्याला उपयोगी पडेल आणि त्याचा योग्य प्रकारे वापर होऊन त्यातून बचतही होईल.

भरपूर कष्ट करा, भरपूर कमवा व भरपूर खर्चही करा. परंतु खर्चाचे नियोजन करा. पैसे हातात आले की, सर्वात आधी त्यातून भगवंतांचा हिस्सा काढावा. त्यानंतर घरासाठी किती लागतील ते पैसे बाजूला काढावेत व्यापार व्यवसायासाठी लागतील ते पैसे बाजूला काढावेत. बचत म्हणून बाजूला काढलेले पैसे लगेच गुंतवून टाकावेत.

अशा प्रकारेच्या योग्यप्रकारे आपण धनाचे नियोजन केले तर कधीही आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही. तसेच जर पैसे येतातच जाण्यासाठी असे कोणीही नाही की, ज्यांच्याकडे पैसे येऊनच थांबून राहिला. पैसा येतो आणि असा जातो. परंतु योग्यप्रकारे आपण त्याचे नियोजन केले तरच हे शक्य आहे.

उद्यासाठी बचत जरूर करावे. आपल्या उत्पन्नातील 20 टक्के हिस्सा हा उद्यासाठी ठेवूनच द्यावा. कारण आपल्यापुढे उद्या काय वाढून ठेवले आहे हे आपल्याला माहीत नसते. म्हणून भविष्य काळात प्रत्येक समस्येला व सुख दुःखाला सामोरे जाण्यासाठी बचत अवश्य करावी.

पैशांचा जर सदुपयोग केला गेला तरच पैसा टिकतो. जर पैशांचा दुरुपयोग केला पैसे कोणत्याही वाईट कार्यासाठी वापरले तर ते पैसे कधीच टिकत नाहीत. मग आपण लाख रुपये महिना जरी कमवला, परंतु दारू, जुगार, मारामारी,

कुणाचे वाईट करणे यात जर पैसा गुंतविला तर शेवटी आपल्या हातात 1 रुपयाही राहणार नाही. म्हणून भगवंतांच्या कार्यात चांगल्या कार्यात तसेच आपल्या कुटूंबसाठी आपल्या पैशांचा सदुपयोग करा. पैसा आपोआप टिकू लागेल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *