मंगळसूत्रामध्ये का असतात दोन वाट्या आणि काळे मणी? जाणून घ्या शास्त्रीय कारण.

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलगी जेव्हा विवाह बंधनामध्ये अडकते तेव्हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले जाते. पती आपल्या पत्नीला विवाहाच्या दरम्यान मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत असतो. तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ लागते. एका सवासिनीची ओळख तिच्या मंगळसूत्रावरून होत असते.

एखादी स्त्री तिच्या गळ्यामध्ये जेव्हा मंगळसूत्र घालते तेव्हा कुमारीपासून तिची ओळख एक सुवासिनी अशी होते. म्हणजेच सवासिनी याद्वारे जग तिला ओळखु लागत. अनेकदा मंगळसूत्र म्हणजे लग्नाचे लायसन्स आहे अस म्हणून थट्टा सुद्धा केली जाते. परंतु या मंगळसूत्राला अ ध्या त्मि क तसेच धार्मिक सुद्धा म ह त्त्व आहे.

मंगळसूत्र हे सवासिनी स्त्रीचे शस्त्र मानला जात. अशा महिलेकडे कोणीही वाईट नजरेने पाहत नाही. मंगळसूत्रामध्ये काचेच्या काळ्या रंगाच्या दोन पदरी गुंफण केलेली, तसेच मध्यभागी सोहळ्याचे दोन दोन मणी, तसेच मध्यभागी दोन वाट्या असतात.

अशा प्रकारे मंगळसूत्राची रचना असते. तर मग मित्रांनो या मंगळसूत्राची रचना अशीच का असते? याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? जर हो तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या माहितीमध्ये नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो मंगळसूत्रामध्ये असणारे 2 पदरीची काळे मणी हे आता पती पत्नींना एकमेकांसोबत आयुष्यभर साथ द्यायची आहे त्याचे प्रतिक आहे. आणि दोन वाटी म्हणजे पती-पत्नी आहेत.

या दोन वाटेच्या आजूबाजूला 4 मनी असतात ते म्हणजे धर्म अर्क काम मोक्ष आणि पुरुषार्थ यांचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच लग्नानंतर मुलीला आई पत्नी असे अनेक कितीतरी नात्यांमध्ये गुंफण करावे लागते. यामध्ये महिलेला धर्माचे आचरण सुद्धा करावे लागते.

मुलगी जेव्हा माहेरी असते तेव्हा तिला घरातील खर्चाबद्दल काळजी करण्याचं कारण नसते. परंतु जेव्हा स्त्री लग्न करून सासरी जाते तेव्हा स्त्रीला घरातील सर्व व्यवहार पहावे लागतात.
यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा समावेश असतो. मंगळसूत्रामधील वाट्या व त्यामधील असणारी तार हे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करत असते.

याचा अर्थ असा होतो की, आता मुलीने माहेरील कुलदैवताला विसरून सासरच्या कुलदैवतला वंदन करायला हवे. या कुलदेवतेचा सन्मान करून आपल्या कुळाला वाढायला हवे त्याचेही प्रतीक असते. त्याच बरोबर मंगळसूत्रामधील 2 वाट्या 1 हळद माहेरचे प्रतिक असते तर दुसरे कुंकू म्हणजे सासरच प्रतीक असते.

मंगळसूत्राप्रमाणेच पती-पत्नी यांचे नाते पवित्र असते आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लग्नानंतर मंगळसूत्र घालणं पवित्र मानला जात. यामुळे महिलेच्या कलाकार भूषणमध्ये वाढ होते.

पण त्याचबरोबर त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ होतेच पण त्याचबरोबर मंगळसूत्र परिधान केल्याने पतीस सुद्धा पत्नीकडे आ क र्षि त होत असतो. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र या दागिनेला अतिशय म ह त्त्व प्राप्त झालेले आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *