अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठ आणि पोटदुखी थांबेल, हे औषध घरीच बनवून प्या.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

बराच वेळा बाहेरचे जेवण, जेवणाची वेळ बदलणे, अतिप्रमाणात जेवण करणे किंवा मंदावलेली पचनक्रिया यासारख्या कारणांमुळे अपचन होऊन पोट डम्बरल्यासारखे जाणवते, शौचाला साफ होत नाही आणि पोट गच्च गच्च होऊन त्रास व्हायला लागतो.

अशावेळी गोळ्या औषधे घेण्यापेक्षा आजचा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुमची पोटदुखी आणि अपचनाच्या सर्व समस्या मुळापासून आणि कायमचा नष्ट करतो. हा घरगुती उपाय बनवण्यासाठी जे तीन घटक आपल्याला लागणार आहेत हे अगदी सहजपणे आपल्या घरातच उपलब्ध होतात.

त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. असा हा गुणकारी उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक घटक लागणार आहे अद्रक. काही ठिकाणी याला आले या नावाने सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो हे आद्रक पोटदुखी, अपचन आणि बद्धकोष्ट यासाठी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे एक आयुर्वेदिक औषध आहे.

याचा वापर कशाप्रकारे वापर करायचे हे खूप अत्यंत महत्त्वाचे असते. आपण हे आद्रक किसून यामधील रस वेगळा करून घ्यायचा आहे. आपल्याला एक वेळच्या या उपायासाठी एक चमचा रस लागणार आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लिंबू.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि अपचन आणि गॅसेस, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. याचा वापर ठराविक प्रमाणात आणि योग्य त्या अनुकरणासोबत करायला हवा. आपणास साधारण दोन चमचे येवढे लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि शेवटचा घटक म्हणजे खडीसाखर.

आपण मोठ्या आकाराची खडीसाखर या उपायासाठी वापरायची आहे आणि तिची बारीक अशी पावडर बनवून घ्यायचे आहे. बारीक केलेली खडीसाखर एक चमचा एवढी आपणास लागणार आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खडीसाखर न वापरता हा उपाय करायचं आहे. मित्रांनो अपचन, गॅसेस किंवा बद्धकोष्ट, पोटदुखी यासारख्या सामान्य समजल्या जाणाऱ्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत राहिले याचे मात्र फार मोठे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. म्हणूनच वेळेतच आपल्या आहार विहारात बदल करून,

दररोज थोड्या प्रमाणात व्यायाम करून अपचनाचा उपचार केला पाहिजे. हे तयार केलेले मिश्रण सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणानंतर प्यायचे आहे. याच्या पहिल्या दिवसाच्या वापराने तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय सलग तीन ते चार दिवस केल्याने या सर्व समस्यांपासून तुमची कायमची सुटका होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *