भगवान दत्तगुरू सोबत नेहमीच गाय, कुत्रे का असतात?

अध्यात्मिक माहिती

भगवान श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार दत्तात्रेयांमध्ये त्रिदेवाची देवाची शक्ती अस्तित्वात आहे, म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो. तर त्यांच्या पाठीमागे असलेल्या औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप मानले जाते.

कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. श्री दत्तगुरु यांच्या आशीर्वादाने जीवनातील बऱ्याच प्रकारच्या समस्या नाहीशा होतात.दत्तगुरूंचा महिमा फार मोठा आहे. त्याच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे सुद्धा खूप पवित्र मानले जाते. पण आपण कधी विचार केला आहे का की, दत्तगुरु यांच्यासोबत असलेले काय आणि कुत्रे कसे प्रतीक आहे?

आणि हे आपल्याला काय संदेश देतात? चला तर मग आज आपण हे जाणून घेणार आहोत.हिंदू पुराणानुसार दत्तगुरुबरोबर असलेली गाय हे पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे. हे सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे चार वेद होय. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद होय. दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते.

तिचा भावार्थ याप्रमाणे आहे की, झोळी हे मधमाशांचे प्रतीक आहे. मधमाशा जश्या ठिकठिकाणी जातात आणि मध एकत्र जमतात. तसेच दत्तगुरु फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात. कारण दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं कार लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक मानले जाते.

दंड या वस्तू त्याच्या सोबत असतात. संन्यासी विलुप्त असतो. त्याच्या वस्तू या एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे. कारण कमांडरू हेच त्यांचे अधिक धन आहेत असे मानले जाते व त्यांच्या हाती त्रिशूळ आहे. त्रिमूर्ती रूपातील महेशच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद आढळतो.

महेशच्या हातातील त्रिशूल शृंग आणि वस्त्र आढळत नाही. त्याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळे हात नाहीत.
तर अशा प्रकारे दत्तात्रेयांच्या सोबत गाय, कुत्रे आणि त्रिशूल याचा अर्थ असा होतो. आपल्या प्रत्येकाला वाटते की, आपल्यावर दत्त गुरूंचा आशीर्वाद असावा.

आपल्या घरातील दर्शनी भाग आहे त्यात दर्शनी भागावर दत्तगुरुचा एक तरी फोटो असला पाहिजे. दत्तगुरूंचा फोटो लावण्याची दिशा ही उत्तर दिशा आहे. त्या दिशेला दत्तगुरूंचा फोटो लावा त्या फोटोला रोज नमस्कार केला आणि आपल्या प्रगतीसाठी प्रार्थना करा, यामुळे त्यांचा आपल्यावर नेहमी आशीर्वाद राहील आणि कोणत्याच कामात अडचणी येणार नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *