या 3 राशी असतात चुगलखोर!कोणत्या आहे त्या राशी ?

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो तुमच्या आजूबाजूला चुगल खोर लोक असतात. चुगलखोर लोक म्हणजे कशी तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही. तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं तिखट मीठ लावून दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगणारच. अशा लोकांना गॉसीफ फार आवडतं आणि यांच्या पोटामध्ये कुठलाही रहस्य दडून राहू शकत नाही. मग आपण बघू यात कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगल खोर म्हणू शकतो.

मित्रांनो प्रत्येक राशी मध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात. कोणीही व्यक्ती परफेक्ट नसतो. सर्वगुणसंपन्न असं कोणी नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी चांगलं आणि काही ना काही तरी दोष हे असतातच आणि अशाच तीन राशी आहे ज्यांच्यामध्ये चुगल खोरी करण्याचा दोष असतो. चुगल खोरी म्हणजे काय इकडचे तिकडे सांगणं.

मिथुन रास – मिथुन राशीचे ग्रहण शीलता स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती आणि हजरजबाबीपणा यांना तोडच नाही. म्हणजे मनोरंजक संवाद कौशल्याने ते लोकप्रिय होतात. हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले पण होऊन ते गप्पिष्ट असतात. त्यांना खूप गप्पा मारायला आवडतं आणि भीडभाड न ठेवता बोलतात.

पण बोलायच्या नादात ते इतरांची गुपित सुद्धा उघड करतात. ज्याला आपण इकडं-तिकडं करणं म्हणतो आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही. पण बोलायच्या नादात त्यांच्याकडं बोलले जात आहे खरं आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा.

कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशोब असतात तसेच अतिचिकित्सक सुद्धा असतात. कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाक सुद्धा तुम्ही करता. पण कन्या राशीच्या व्यक्तींना सुद्धा एखादा गुपित जर तुम्ही सांगितलं तर ते किती काय त्यांच्याजवळ राहील याची गॅरंटी कोणीही घेऊ शकणार नाही.

आता त्यांचाही हेतू वाईट नसतो. पण ते इतरांबद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात. इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब. स्वतः मात्र तर्कसंगत करून सांगतात. त्यांच्या कृतीत काहीही चुकीचं दिसत नाही. पण शेवटी इकडचा तिकडे सांगतात हे खरं.

वृश्चिक रास – वृश्चिक राशीचे लोक अतिशय चाणाक्ष व चतुर असतात. उडत्या पाखरांचे पंख सुद्धा वृश्चिक राशीची लोक मोजू शकतात. इतकी हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. पण स्वतःच्या बाबतीत मात्र हे कमालीची गुप्तता पाळतात म्हणजे स्वतःच्या कुठल्याही गोष्टीबद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत.

पण हा दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलता रस असतो. दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते. बरं जाणून घेतल्यानंतर त्या स्वतःपुरतं ठेवतील असं नाही.

तर त्या इतरांना सुद्धा मोकळ्या मनाने सांगतील स्वतःबद्दल काहीच बोलणार नाही. पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो. तुमच्या आजूबाजूला जर एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीजवळ तुम्ही काहीही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज नाही.

तर मित्रांनो या होत्या त्यात तीन राशी ज्यांच्या पोटात काहीही राहात नाही किंवा असं म्हणूया ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडे करण्याची सवय असते. आता तुमची रास यामध्ये आहे का.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *