स्वामींबाबत विशेष माहिती भाग – १ जाणून घेण्यासाठी स्वामींच्या चरणांवर क्लिक करा..

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ

मंडळी आपण स्वामी भक्त तर आहोत पण बऱ्याच भक्तांना स्वामीची पुरेशी माहिती नसते तर खास अश्या लोकांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत स्वामीबाबतच्या विशेष माहितीचा भाग   क्रमांक १

स्वामी कसे दिसत असतील??स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना..ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान..न जाणो आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू..आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल.

आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्याला ही चांगलंच झापल असेल. समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात – सव्वा सात फूट होती. त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल. त्यांची नखे कापायला न्हावी येत तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या चं जणू. हातानेही ती तुटत. त्यांची पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे. चिखलातून ही जर स्वामी चालले तरी त्यांची पाऊले लखलखीत स्वच्छ.

त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जणू सारं ब्रह्मांडच सामावलंय त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ, कोमल होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा अंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई.

स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध असे तर कधी पन्हे. स्वामींची जेवणाची तऱ्हा ही निराळीच. कित्येक दिवस, महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात ६०० ते ७०० भाकऱ्या खात.

दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून “जेवण घाल गे माये” अस म्हणत.पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गायीला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन जेवत स्वामी ही त्यांना प्रेमाने घास भरवत.

याच्या पुढील माहिती लवकरच या पेज वर देण्यात येईल   ही माहिती आणि अश्याच स्वामींच्या खास माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे पेज लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *