संपूर्ण एप्रिल महिन्यात नसणार विवाह मुहूर्त?

अध्यात्मिक माहिती

लग्नाच वय झालेल्याना लगीन घाई झाली असेल तर एप्रिल तुम्हाला साथ देणार नाही. होय!! ज्योतिष शास्त्रानुसार संपूर्ण येथील मधील लग्न, साखरपुडा आणि शुभकार्यासाठी कोणताही शुभमुहूर्त आणि म्हणून सर्व शुभकार्य 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. चला जाणून घेऊ या याबद्दल सविस्तर माहिती या..

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा सूर्य जवळ येतो तेव्हा आस्त होतो. देव गुरु हा धर्म आणि शुभकार्याचा कारक मानला जातो. या कारणास्तव गुरु अस्त झाल्यावर शुभ कार्य होत नाहीत असं म्हणतात. या वेळी 2 ते 29 एप्रिल या कालावधीत गुरु अस्त होणार असल्याचे पाहायला मिळत आहेत आणि म्हणून या 27 दिवसांमध्ये विवाह आणि इतर शुभकार्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाहीत.

ज्योतिष शास्त्रानुसार 15 मार्च बुधवारी सकाळी 6:47 यांनी सूर्याने देव गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला. यामुळे संपूर्ण एप्रिलमध्ये लग्न, गृहाप्रवेश यासह इतर कोणत्याही शुभकार्यासाठी शुभमुहूर्ता राहणार नाहीत. 29 एप्रिलला गुरूचा उदय होणार असला तरी लग्नाचा मुहूर्त 2 मे पासून आणि गृह प्रवेश 3 मेपासून सुरू होईल असा ज्योतिषी सांगतात.

सौर मंडळांमध्ये गुरूला एक विशेष स्थान आहे. गुरूला देवतांचा गुरू मानले जातात. त्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात सूर्याला आत्म्याचा आणि चंद्राला मनाचा घटक मानला जातो. त्याचप्रमाणे गुरूला शारीरिक शक्ती आणि ज्ञानाचा घटक मानलं जातं. ज्योतिष शास्त्रात गुरु हा सौम्य आणि शुभकार्याचा प्रतिनिधी ग्रह मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा गुरुची राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो, तेव्हा गुरु निस्तेज होतो त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव खूप कमी होतो.
मात्र शुभकार्यासाठी गुरु मजबूत स्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे एप्रिल महिन्यात शुभकार्य मनाई केलेली आहे. विशेष विवाह तर अजिबात होत नाही याचं कारण म्हणजे लग्नासाठी सूर्य आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान असले पाहिजेत. तसेच 12 वर्षातून एकदाच भाग सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत येतो तेव्हा देखील मांगलिक कार्य करू नयेत असा ज्योतिषी सुचवतात..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *