आपल्या देवघरातील देवापुढे दिवे कसे लावायचे? त्याचे कोणते नियम आहेत? आणि त्या नियमाचे जर आपण पालन केले तर आपल्याला काय फायदे मिळतात? ते आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपल्या देवघरात दिवे कशाप्रकारे लावायचे. मंडळी दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला असावा. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आले आहेत.
मंडळी पश्चिम दिशेला दिव्याची वाट असल्यास आपल्याला अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असे सांगितले जाते. देवासमोर लावलेला दिवा विजला किंवा दिवा लावताना विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही.
त्यामुळे दिवा विजल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांती करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांती करावी असे सांगितले जाते. दिव्याबद्दल बरीच माहिती तुम्हाला मिळाली. त्यामुळे आता नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने तुमच्या देवघरात दिवे लावू शकता व आपला फायदा करून घेऊ शकता.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.