वास्तुदोष आणि आजार यांचा काही संबंध आहे का?..

वास्तूशास्त्र राशिभविष्य

आपल्या घरी वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने केवळ नफा मिळण्यात किंवा समाजात मान-सन्मान मिळवण्यातच नाही तर आपले आरोग्य चांगले राहण्यास देखील मदत होत असते. जर तुमचे घर वास्तू नियमानुसार बांधले गेले नाही तर घरात राहणार्‍यांना जीवघेण्या आजाराचा सुद्धा सामना करावा लागू शकतो.

मग वास्तुदोषाचा घरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती दिली आहे. तुमच्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात शौचालय किंवा सेप्टिक टाकी, स्वयंपाक घर, जड बांधकाम किंवा मोठे झाड असल्यास कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा विविध आरोग्य समस्यांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

त्याची रोगप्रतिकारक शक्ती होऊ शकते. काही जणांच्या बाबतीत टीबी किंवा कॅन्सर देखील होऊ शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. याचबरोबर दक्षिण पूर्व भागातील वास्तुदोष यामुळे लोकांना किडनीचे आजार होऊ शकतात. दक्षिण विभागात तळघर, पाण्याची टाकी, मुख्य दरवाजाची भाग किंवा कमी उंचीचे बांधकाम असल्यास महिलांना विविध आजार होऊ शकतात.

याशिवाय, उत्तर पश्चिम भागातील वास्तुदोष असल्यास कुटुंबातील सदस्यांना विविध संसर्गजन्य रोग आणि ऋतू बदलाचे आजारसुद्धा होऊ शकतात. घराच्या दक्षिण-पश्चिम भागात काही वास्तुदोष असल्यास मालकाला हृदयविकार होण्याची शक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे ईशान्य आणि दक्षिण पश्चिम भागांत वास्तुदोष असल्यास त्यामुळे पक्षाघाताचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते.

घरी मुलेही आजारी पडू शकतात आणि गरोदर स्त्रियांना ही गर्भधारणा झाल्यावर काही त्रास जाणवू शकतो. कधीही उत्तर दिशेकडे तोंड करून झोपू नका, कारण त्यामुळे पचनाच्या समस्या आणि डोकेदुखी, मानसिक आजार, अस्वस्थता आणि हृदयाच्या समस्या देखील होऊ शकतात. पश्चिम उत्तर पश्चिम झोनमध्ये झोपलेल्या लोकांना शारीरिक आजारापेक्षा मानसिक होण्याची शक्यता असते आणि अशा वास्तू दोषांवर वेळीच उपाय न केल्यास ते घरातल्या लोकांसाठी हानीकारक ठरू शकत.

परिस्थिती तणावपूर्ण होऊ शकते. अभ्यास करताना किंवा करताना उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करा, त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. तुळस किंवा तुळशीची लागवड केल्यास घरातील हवा शुद्ध होते. रबर प्लांट, बोन्साय आणि इतर काटेरी झाडे लावू नका, त्यामुळे तुमचा आजार वाढू शकतो तर तणावही वाढू शकतो. तुमच्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात पायऱ्या किंवा शौचालय तर कधीच बांधू नका, त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होते. मुलांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो.

तसेच घराच्या नैऋत्य दिशेला जर मास्टर बेडरूम असेल तर शारीरिक आणि मानसिक स्थिरता येते. शयन कक्ष ईशान्य दिशेला बांधू नका, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोकं येऊन झोपावं हे शांत आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देत. उत्तर दिशेला झोपणं योग्य नाही कारण त्यामुळे तणाव आणि वेदना वाढतात.

तसेच गर्भपात होण्याची शक्यता टाळण्यासाठी गर्भवती महिलेने ईशान्य दिशेला झोपणे टाळावे, तसेच स्टोरेज स्पेस असलेल्या बेडमुळे मेंदू आणि हृदयाशी संबंधित आजार होतात. तसंच लोखंडी पलंगावर झोपण टाळा, त्यासाठी साध्या लाकडी पलंगाची निवड करा. तुमचा पलंग आरशासमोर ठेवू नका त्यामुळे वाईट स्वप्न आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

याचबरोबर तुमचा पलंग कधीही शौचालयाच्या भिंतीशी जोडलेला नसावा, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. चांगली झोप येण्यासाठी मोबाईल फोन ब्रेडपासून दूर ठेवा. स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते आणि डायनिंग रुमसाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते, कारण ते प्रभावी पचन आणि चांगलं आरोग्य वाढवतो.

ईशान्य दिशेला स्वयंपाक घर डिझाईन केल्याने खंबीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच सगळ्यात महत्त्वाचं शौचालय आणि स्वयंपाकघर एकत्र बांधणं टाळा,कारण त्या दोघांना एकमेकांपासून अंतरावर ठेवा..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *