सिंह राशीबद्दल खास गोष्टी; तुम्ही पण असेच आहात का ?

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो सिंह राशीची लोक जरा दणकट असतात, थोडा उग्रपणा असतो. यांच्या चेहऱ्यावर यांचे केस विरळ असतात आणि नाकाचा शेंडा थोडा पुढे आलेला असतो आणि डोळे थोडे मोठे असतात आणि पाठीच्या कण्याला थोडा बाक असतो. म्हणजे सिंह राशीची प्रत्येक व्यक्ती अशीच दिसायला हवी असे नाही पण या लोकांमध्ये हे गुण बऱ्यापैकी दिसून येतात.

सिंह राशी हि स्थिर स्वभावाची राशी आहे, स्थिर स्वभावाची असल्याने या लोकांची बुद्धी स्थिर असते आणि म्हणून हे लोक खूप छान प्लानर असतात , कोणत्याही गोष्टीचे खूप छान नियोजन करूनच ते काम पूर्ण करतात, एखादे काम करायचे ठरवले कि हे आता करायचे आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयन्त करतात.

स्थिर स्वभाव म्हणजे यांच्या आयुष्यातील तत्व हे कधीच सोडत नाही. कितीही कठीण परिस्तिथी आली तरी हे लोक आपली तत्व सोडत नाही. कारण तत्व सोडली कि याना खूप त्रास होतो, सिंह राशी हि रजोगुणी राशी आहे , रजोगुणी म्हणजे यांच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो , कोणतीही गोष्ट ते आत्मविश्वासाच्या जोरावर बोलू शकतात.

यांच्या बोलण्यामध्ये दबदबा असतो, हि लोक कोणत्याही परिस्तिथीवर मात करू शकतात. व्यवहारी पण या लोकांमध्ये असतो. स्वतंत्र वृत्ती असते. सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. रवी म्हणजे उदारतेचे उदाहरण म्हणजे जसे सूर्य प्रकाश मिळतो सर्वाना तसाच सिंह राशीची व्यक्ती या खूप उदार असतात.

उदार होऊन त्या लोकांना आर्थिक मदत सुद्धा करतात तसेच बऱ्यापैकी खूप गोष्टींमध्ये मदत करत असते, सूर्यासारखे प्रखर तेज या लोकांमध्ये असते. तसेच सिंह राशी हि अग्नितत्वाची राशी सुद्धा आहे. चार चौघांमध्ये उठून दिसणारी राशी आहे. प्रखर बुद्धिमत्ता असलेली हि राशी आहे. सिंह राशीचे चिन्ह हे सिंह आहे

सिंह म्हणजे राजा. त्यामुळे राजाचे गुण सुद्धा हे सिंह राशीमध्ये असतात. न्यायप्रियता , क्षमाशीलता असेल हे राजाचे गुण या लोकांमध्ये असतात.नेतृत्वपण सुद्धा या लोकांमध्ये ठासून भरलेला असतो. कधी हि कोणाला काही मदत लागली किंवा राजकीय क्षेत्रात पुढे राहणे हे याना आवडते, हे लोक राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात , समाज सेवेमध्ये आणि मेडिकल क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात.

या लोकांना स्वतःची दुःख कवटाळून बसायला आवडत नाही. ते सोडून देतात किंवा कधी कोणाला सांगत सुद्धा नाही. सिंह राशीचा अंमल हा पाठीच्या कण्यावर असतो किंवा हृदयावर असतो आणि रक्ताभिसरण संस्थेवर असतो. सिंह राशी बिघडली तर या लोकांना मणक्याचा त्रास, पाठीच्या कण्याचा त्रास होऊ शकतो. सिंह राशी हि महत्वकांक्षी, उदार,छान आहे.

फक्त एक अशी गोष्ट आहे कि हे लोक कधीच कमीपणा घेत नाही. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर त्या कधीच पटत नाही, किंवा कमीपणा घेणे याना आवडत नाही. सिंह राशीच्या लोकांनी थोडा कमीपणा घेतला किंवा स्वतःच्या चुका सुधारल्या तर तुम्ही नक्कीच आयुष्यात अजून पुढे जाऊ शकता. सिंह राशीचे मकर राशींसोबत पटत नाही

कारण सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि मकर राशीचा शनी हे दोघे शत्रू ग्रह आहे. रवी प्रधान लोकांना स्वतःची दुःख कवटाळून बसायला आवडत नाही. शनी प्रधान लोकांना स्वतःची दुःख कवटाळून बसायला आवडतात, उदास होतात. एका खोलीमध्ये जाऊन बसतात.

सिंह राशीचे अजून एका राशींसोबत पटत नाही ती म्हणजे मीन राशी.मीन राशी हि गुरुची राशी आहे आणि गुरुमध्ये स्वाभिमान असतो आणि रवी मध्ये अभिमान असतो, सिंह राशी हि एकंदरीत छान राशी आहे फक्त जर ह्या लोकांनी अहंकार न बाळगता स्वतःच्या चुका मान्य करून सुधारल्या तर अजून यश भेटेल.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *