नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रानुसार घरची स्त्री ही लक्ष्मी समान मानली गेली आहे. त्यामुळे घरातील स्त्रियांचे वर्तन हे लक्ष्मी प्रमाणे असावे. हिंदू धर्म शास्त्रानुसार घरातील स्त्रीने चांगले वर्तन केले तर घरातील सुख समृद्धी आणि पैसा टिकून राहतो.
मित्रांनो या उलट घरातील स्त्रीचे व र्त न धर्मा विरुद्ध असेल किंवा चांगले नसेल तर घरी लक्ष्मी थांबत नाही त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि आनंदही राहत नाही. आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे की त्या केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरी कधीही टिकत नाही. घरामध्ये पैसा अडका धनसंपदा आनंद, शांतता काहीही राहत नाही.
चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी –
पहिली गोष्ट आहे घरातील स्त्रीने झाडूला पाय लावणे. काही स्त्रिया अंगणात किंवा घरी झाडत असताना झाडू खाली पडला तर ते पायाने ढकलतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. असं केल्याने माता लक्ष्मीचा अ प मा न होतो. मैत्रिणीनो झाडूची पण दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करतो. आणि त्याच लक्ष्मीला जर आपण पाय लावला किंवा पायाने ढकलले तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि घरातून निघून जाते. ज्या घरात झाडूला ला थ मारणाऱ्या स्त्रिया असतात. त्या घरी लक्ष्मी कधीही प्र वे श करत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे खरकटी उष्टी भांडी गॅस वर ठेवणे किंवा चुलीवर ठेवणे. जिथे आपण जेवण करतो त्या खोलीत पसरून ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. खरकटी भांडी ठेवल्यामुळे स्वयंपाक घरात नव्हे तर पू र्ण घरात नकारात्मकता येते.
घरातील प्रमुख व्यक्ती सूर्योदयानंतरही झोपून राहतात किंवा दिवसा खूप वेळ झोपून राहतात आणि लोळून काढतात. तसेच काही महिला सासू-सासऱ्यांचा अनादर करतात. अशा ठिकाणी लक्ष्मी थांबत नाही. तसेच आळशी लोक काम चोर, लोक भ्रष्टाचारी लोक, कपटी लोक अशा लोकांच्या घरी लक्ष्मी थांबत नाही. अशा प्रकारच्या वाईट लोकांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नाही.
पुढची गोष्ट म्हणजे काही महिलांना उंबरठ्यावर बसून जेवण करण्याची म्हणजे जेवण्याची आणि गप्पा मारण्याची सवय असते. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. कारण उं ब र ठ्या वर बसून जेवण केल्याने आणि गप्पा मारल्यामुळे लक्ष्मीच्या येण्यात अडथळे येतात आणि म्हणून लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत नाही. या शिवाय उंबरठ्यात भगवान विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते.
मित्रांनो ज्या घरात वा रं वा र भांडण वाद तंटे होतात अशा ठिकाणी लक्ष्मी प्रवेश करत नाही ज्या घरात सुनेला नोकराप्रमाणे वागवले जाते, सासू-सासरे सारखे टोचून बोलतात किंवा नवरा छळतो किंवा सून सासरी चांगलं वागत नसेल अदबीने वागत नसेल सारखा सासू-सासऱ्यांचा आणि घरातील इतर लोकांचा अपमान करत असेल तर अशा ठिकाणी ही लक्ष्मी येण्यास तयार होत नाही.
मित्रांनो घरातील स्त्रिया उशिरा उठतात किंवा सूर्य डोक्यावर येई पर्यंत झोपतात अशा ठिकाणी लक्ष्मी प्रवेश करत नाही अशा स्त्रियांच्या घरी पैसा असला तरी हळूहळू तो कमी होत जातो अशा स्त्रियांच्या माहेरीही दा रि द्र्य येते.
मित्रांनो वरील गोष्टी घरातील प्रमुख स्त्रीनेच नाही तर घरातील प्रमुख पुरुष आणि घरातील इतर सदस्यांनीही पाळल्या पाहिजेत. तरच लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. तुमच्या घरी सुख समृद्धी आणि आनंद भरून राहील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.